चंद्रानंतर आता इस्त्राे सूर्याचे रहस्य उलगडणार; आदित्य एल-१ सप्टेंबरमध्ये लाॅन्च हाेणार

चंद्रानंतर आता इस्त्राे सूर्याचे रहस्य उलगडणार; आदित्य एल-१ सप्टेंबरमध्ये लाॅन्च हाेणार
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 27/8/2023 :
चांद्रयान -३ या माेहिमेनंतर आता भारत साैर माेहीम प्रक्षेपणासाठी सज्ज हाेत आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल १ सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाॅन्च हाेणार आहे, अशी घाेषणा नुकतीच भारतीय अवकाश संशाेधन संस्थेचे प्रमुख एस. साेमनाथ यांनी केली. यामुळे सूर्याचे अनेक रहस्य उलगडणार असल्याचे सांगितले जाते.
आदित्य एल १ या अवकाशीय सौर वेधशाळेची निर्मिती
सूर्य हा पृथ्वीला सर्वांत जवळ असणारा तारा आहे. सूर्याच्या अभ्यासातून ताऱ्यांची रचना आणि त्यांच्या जीवनक्रमाविषयी मोलाची माहिती मिळू शकते. आपल्या सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने बांधून ठेवले आहे. सूर्याच्या वातावरणात घडणाऱ्या घटनांचा पृथ्वीसह संपूर्ण सूर्यमालेवर प्रभाव पडत असतो. सूर्याच्या वातावरणात घडणाऱ्या घटनांमगील विज्ञान उलगडण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) पुढाकाराने आदित्य एल १ या अवकाशीय सौर वेधशाळेची निर्मिती करण्यात आली आहे.