ताज्या घडामोडी

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते – पाटील यांची जयंती साजरी

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते – पाटील यांची जयंती साजरी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 25/7/2023 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च , शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि . २५/०७/२०२३ रोजी राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते – पाटील (अक्कासाहेब ) यांची ९८ वी जयंती साजरी करण्यात आली. राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते – पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. अक्कासाहेबांच्या जयंतीकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य , कार्यालयीन अधिक्षक , विभागप्रमुख , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते – पाटील (अक्कासाहेब ) यांच्या जयंती निमीत्त मेकॅनिकल पदविका विभागातील प्रा . रवीकांत देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या मनोगतामध्ये अक्कासाहेब यांच्या महान जीवन कार्याची माहिती देत असताना अक्कासाहेबांनी सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील यांना सामाजीक व शैक्षणिक कार्यामध्ये कशाप्रकारे खंबीरपणे साथ दिली हे सांगीतले . तसेच प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एक स्त्री असते या उक्तीप्रमाणे अक्कासाहेब या काकासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या असे सांगीतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा . श्रीकांत कासे यांनी केले .

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.