आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धनुरर्धरांना नोकरीत ५% आरक्षण पूर्ववत ठेवण्याची आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या मागणीस क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचा सकारात्मक प्रतिसाद! 🟣नोकरीतील ५% आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी तातडीने आदेश निर्गमित करु! : क्रीडामंत्री संजय बनसोडे

🔵धनुरर्धरांना नोकरीत ५% आरक्षण पूर्ववत ठेवण्याची आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या मागणीस क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचा सकारात्मक प्रतिसाद!

🟣नोकरीतील ५% आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी तातडीने आदेश निर्गमित करु! : क्रीडामंत्री संजय बनसोडे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

मुंबई दिनांक 25/7/2023 : इंडियन राउंड क्रीडा प्रकारातील धनुरर्धरांना नोकरीत ५% आरक्षण पूर्ववत मिळावे म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी दिलेल्या निवेदनाला क्रीडामंत्री ना. संजय बनसोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत,
नोकरीतील ५% आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी तातडीने आदेश निर्गमित करु.असे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 19 जुलै 2023 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार धनुर्विद्या क्रीडा प्रकारातून इंडियन राउंड पाच टक्के शासकीय नोकरीच्या आरक्षणातून रद्द करण्यात आला होता.
त्या संदर्भात आज अधिवेशन काळात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे, यांनी मुंबई येथे भेटून लेखी निवेदन दिले व इंडियन राउंड धनुर्विद्या प्रकार 5% शासकीय नोकरी आरक्षणामध्ये पूर्ववत चालू ठेवण्याबाबत विनंती केली.
मंत्री संजय बनसोडे यांनी यावर तातडीने कार्यवाही करून पूर्ववत इंडियन राऊंड पाच टक्के आरक्षणासाठी ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येतील असे आश्वासन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व हरिदास रणदिवे यांना दिले.
क्रीडा क्षेत्रातील चांगल्या कामांना माझ्याकडे नेहमीच दारे उघडी असतील , आपण जास्तीत जास्त क्रीडा विकासाच्या संदर्भामध्ये माझ्याकडून कामे करून घ्यावीत असेही मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील हजारो इंडियन राऊंड धनुर्विद्या खेळाडूंच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व सचिव हरिदास रणदिवे यांनी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना अकलूज येथे रविवारी 23जुलै रोजी निवेदन देऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार आ. मोहिते-पाटील यांनी आज मंगळवारी २५ जुलै रोजी विधान भवनात मंत्री महोदयांच्या दालनामध्ये भेट घेऊन हा विषय सविस्तरपणे मांडला व लेखी निवेदन दिले. यावर मंत्री संजय बनसोडे यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.