महाराष्ट्र

“दूध नव्हे जहर पितो आहे महाराष्ट्र, दूध भेसळीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी सरकार जबाबदार” : विठ्ठल पवार राजे.

“दूध नव्हे जहर पितो आहे महाराष्ट्र, दूध भेसळीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी सरकार जबाबदार” : विठ्ठल पवार राजे.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 23/7/2023 :
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra Rajya) सद्य दुधाचे उत्पादन साधारण 2.75 कोटी लिटर पेक्षा कमी आहे, राज्यात दररोज नोंदणी कृत दूध साधारण सव्वा कोटी लिटरच्या आसपास आहे तर बिगर नोंदणीचे दूध हे तितकेच आहे, खाजगी आणि नोंदणीकृत असे आणि बाहेरून येणारे सर्व दुधाचा हिशोब केला तर साधारण अडीच कोटी लिटर इतका दुधाची उपलब्ध आज महाराष्ट्र मध्ये आहे. तर महाराष्ट्र राज्यात दररोज साधारणपणे साडेतीन ते चार कोटी लिटर इतकी दुधाची मागणी आहे. मागणी आणि उत्पादन यामध्ये साधारण एक कोटी पेक्षा जास्त लिटरची कमतरता आहे, फरक आहे,! मग बाकीचे दूध येथे कुठून साधारण एक कोटी लिटर दूध हे दररोज बाहेरून येते. पण ते कुठून येते साधारण दुधामध्ये 30 टक्के इतकी भेसळ आहे. हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी स्वतः कागदोपत्री पुराव्यानिशी पटवून दिलेले आहे. अशी माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे

(Sharad Joshi Vichar Manch Shetkari Sangathana) अध्यक्ष तथा दूध उत्पादक शेतकरी विठ्ठल पवार राजे (President Vitthal Pawar Raji) यांनी अकलूज वैभव (Akluj Vaibhav), वृत्त एकसत्ता (Vrutt Eksatta), aklujvaibhav.in ला सांगितले. ते म्हणतात की महाराष्ट्र मध्ये दररोज लाखो लोक भेसळीचे दूध नाहीतर जहर पीत आहेत आणि या सर्वांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा प्रणित सरकारची येते.
🔷”राज्याची लोकसंख्या पंधरा कोटीच्या आसपास आहे. प्रत्येक माणसी 200 मिली लिटर दूध एका व्यक्तीला रोज लागते असा हिशोब केला तरी 3 कोटी लिटर दररोज महाराष्ट्र मध्ये लागते. दूध पावडर, पनीर, खवा, मेवा मिठाई व इतर दुग्धजन्य पदार्थासाठी साधारण एक कोटी लिटर इतके लागते. यामध्ये हिशोब केला तर साधारण दररोज सव्वा कोटी लिटरचा तुडवडा असताना देखील दुधाचे भाव हें पडलेलेच आहेत कसे? की दुधाचे दर जाणीवपूर्वक खाजगी दूध संस्था आणि सरकारमधील मिली भगत वाले मंत्रिमंडळ यांनी पाडलेले आहेत. याचा विचार दुग्धजन्य पदार्थ उपभोक्ते तसेच उत्पादक शेतकरी, कष्टकरी कामगारांनी, दूध उत्पादकांनी करणे आवश्यक आहे.”
आणि महाराष्ट्र मध्ये उत्पादनापेक्षा कमी असलेले 1 कोटी लिटर दूध येते कुठून.? का मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या घरी दुधाचे साठे आहेत का.?? एक कोटी लिटर दुधाची दररोज भेसळ आहे.? हें तपासणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाची आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या गृह विभागाची देखील आहे आणि राज्य सरकारची देखील आहे. पण महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातच आता तर भेसळ झालेली आहे तर!, आता अन्नधान्याची भेसळ रोखण्यासाठी सर्व संघटनांना आणि उपभोगत्यांना एकत्र येऊन मोठे आंदोलन उभा करून दररोज लोकं पित असलेले जहर दूध याच्यातली भेसळ थांबवली पाहिजे, रोखली पाहिजे, ही दूधभेसळ म्हणजे मानवी जीविताशी खेळ आहे.
महाराष्ट्र राज्याचे अन्नधान्य दुग्धजन्य पदार्थ दुग्ध भेसळ प्रतिबंधक विभाग यांची आहे. त्यांनी, खाजगी दूध संस्थांनी सरकारकडून रोज चाललेला अन्नधान्य दुग्धजन्य पदार्थ भेसळ खोरीचा खेळ शासनाने थांबवावा अन्यथा आंदोलनरुपी संघर्ष अटळ आहे. असा इशारा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी दिला आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button