कविता विश्व.
मणिपूर..

कविता विश्व…….✍️
मणिपूर..
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 22/7/2023 :
उठले मनी काहूर,
करून काय करणार ?
फक्त निषेधाचाच सुर !
उगवत्या सूर्याचा सुंदर प्रांत,
पाहून हरवते अक्षरशः भ्रांत..
जमाती-जमातीला भिडवून,
स्वर्गासम भूमी केली अशांत !
आमदार त्यांचे जास्त म्हणून,
चौकट मोडून दिले आरक्षण..
ठिणगीचा मग वणवा झाला,
नाही करायला कोणीच रक्षण !
महिलांची लुटल्या गेली अब्रू,
गतप्राण झाली तिथे लोकशाही..
टांगल्या गेली वेशीवर लक्तरे,
सत्तेला काही देणे-घेणेच नाही !
जळणारे मणिपूर पाहून,
मनात भडकू द्या अंगार..
नाहीच पेटून उठलातर,
कैकपट बरे निर्जीव भंगार..
संपायला लागेल इथला श्रृंगार !!
राजेंद्र काळे
बुलडाणा ९८२२५९३९२३