ऐतहासिकदेश विदेशमहाराष्ट्रलेखसामाजिक

(Nepal)नेपाल हा धनगरांचा देश आहे!

नेपाल हा धनगरांचा देश आहे!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 22/7/2023 :
नेपाळ (Nepal) या नावातील पाळ म्हणजेच पाल हा शब्द धनगर (Dhanagar) अर्थाचा आहे. पाल म्हणजे गडरी पाल, पशु पाल, गो पाल या अर्थाचा शब्द आहे तो. मराठीत पाळ हिंदी इंग्रजीत पाल म्हणतात. काही ठिकाणी मेंढ पाळाना ग्वाल गवाल ही म्हणतात. ग्वालियार (Gwalior) शहराच नाव ग्वाल या जातीवरून पडल आहे. नेपाळ देशाचे मूळ रहिवाशी गोरखा (Gorkha) जातीचे लोक आहेत. त्यांना कोणी गुरखाही म्हणतात. गोरखा शब्दाचा अर्थ आहे गो-रखा, म्हणजे गाई राखणारा गुराखी तो गोरखा किंवा गुरखा.
हे गोरखा लोक पशुपाल (Pashupal) in आहेत. पशु हीच त्यांची दौलत आहे. पशुचे कळप बाळगणारे. ते त्या पशुचे मालक, स्वामी, पती असतात. पशुचे मालक ते पशुपती. या पशुपतींचा देव तो पशुपतीनाथ. नेपाळ मध्ये हा पशुपतीनाथ महादेव (Pashupatinath Mahadev) जगप्रसिद्ध आहे. तेच नेपाळ देशाच कुल दैवत आहे.
स्व. रा. चि. ढेरे हे महान इतिहासकार आहेत. त्यांचा ग्रंथ आहे “शिखर शिंगाणापूरचा शंभु महादेव.” या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारचा संत साहित्य पुरस्कार मिळाला आहे. त्यात ढेरे साहेब म्हणतात. धनगर ही जात नाही. धनगर हा शब्द अलीकडे सुमारे 400/500 वर्षा पूर्वी रूढ झाला आहे. धनगर ही जात मूळची गवळी जात आहे आणि ते श्रीकृष्णाचे वंशज आहेत.
जिथे भरपूर पाऊस होतो. तो प्रदेश किंवा बर्फाळ प्रदेशात शेळ्या, मेंढ्या पाळण शक्य नसते. मग अशा जागी धनगर व्यवसाय बदलतात. ते शेती किंवा गाई म्हशी पाळतात. नेपाळ राष्ट्र हिमालयावर आहे. हिमालय भरपूर पाऊस आणि बर्फाळ प्रदेश असल्यामुळे इथल्या धनगरानी शेळी मेंढी पालन बंद करून त्यांनी गो पालन सुरु केले. तर त्या मेषपालाना लोक गोपाल म्हणू लागले. गो पालचा नंतर गो रख्खा म्हणजे गोरखा झाला. गुरं राखी तो गुरखा. पण तो आहे मात्र पालच म्हणून त्याच्या देशाचे नावं ने-पाल आहे.
कोकणातील धनगर बघा तिथे प्रचंड पाऊस पडतो. म्हणून हे लोक मेंढर सोडून गाई पाळायला लागले. म्हणून मग आता त्यांना लोक गवळी किंवा गवळी धनगर म्हणतात.
असा हा गवळी धनगरांचा गुराख्यांचा, गो-राखणाऱ्यांचा, पशु पाळाचा देश म्हणजे नेपाळ आहे.
हे गुरखे जगातील शूर जात आहे, म्हणून भारतीय लष्कर आणि ब्रिटिश लष्करात कायम एक गोरखा रेजिमेंट असतें. त्यात नेपाळी गुरखे भरले जातात.
हे नेपाळी गुरखे धनगर आहेत याची एक मोठी निशाणी सांगतो. नेपाळ मध्ये 90% गुरखे आहेत. तो देशचं गुरख्यांचा आहे. तरी पण या देशात अजून कोणी गुरखा पंतप्रधान वा राष्ट्रपती झाला नाही. क्वचित कधी तरी एखादा थापा, वगैरे नावाचा माणूस मंत्री असतो. नाही तर पंतप्रधान, राष्ट्रपती सह आख्ख मंत्री मंडळ भारतातून गेलेल्या ब्राह्मण, ठाकूर, राजापूत, बनिया लोकांचे असतें. धनगराला लोकशाही, निवडणूकीचे राजकारण जमतच नाही. गुरखे धनगर आहेत याचा यापेक्षा मोठा पुरावा कोणता?

बापू हटकर (Bapu Hatkar)
इतिहास अभ्यासक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.