आपला जिल्हाधार्मिकप्रेरकमहाराष्ट्र

🟣चला पंढरीला जाऊ नामदेव डोळा पाहू

🟠नामदेव महाराज महासंजीवन सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी, कीर्तनकार यांनी धाकट्या आषाढीच्या वारीला पंढरपूरात यावे.

🟣चला पंढरीला जाऊ
नामदेव डोळा पाहू

🟠नामदेव महाराज महासंजीवन सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी, कीर्तनकार यांनी धाकट्या आषाढीच्या वारीला पंढरपूरात यावे.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 10/7/2023 :
कार्तिक वद्य त्रयोदशीला आपण माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीला जातो, फाल्गुन वद्य बीजेला जगद्गरू तुकाराम महाराजांचे देहूमध्ये दर्शन घेतो. फाल्गुन वद्य शेष्टीला एकनाथ महाराज यांच्या समोर नतमस्तक व्हायला पैठणला जकतो. मग संपूर्ण वारकरी परंपरांची आखणी करणाऱ्या नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीला कुठे जातो?
कुठेच नाही? का? नामदेव महाराज यांचे वारकरी संप्रदायातील योगदान कमी आहे का?
ज्या नामदेव महाराज यांनी वारकरी कीर्तन सुरू केले, कीर्तनाचा अधिकार सर्वांना मिळाला, जगातला पहिला अभंग नामदेव महाराज यांनी लिहिला, पहिली आरती त्यांनी लिहिली. इतकी उतूंग वारकरी परंपरेची उभारणी करणाऱ्या नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीला त्यांना वंदन केलेच पाहिजे.
रामदास ऊर्फ शिवदास महाराज जाधव (श्री संत कैकाडी महाराज यांचे वंशज) यांनी धाकट्या आषाढीला नामदेव महाराज यांच्या महासंजीवन सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्याची परंपरा सुरू केली आहे. ती परंपरा अधिक जोमाने पुढे घेऊन जाण्याचा निर्धार ह..भ.प. भारत महाराज जाधव, (श्री संत कैकाडी महाराज यांचे वंशज, मठाधिपती) यांनी केला आहे.
नामदेव महाराज यांचे वारकरी संप्रदायातील योगदान लक्षात घेऊन धाकट्या आषाढीची पंढरीची वारी करूया. तरी नामदेव महाराज महासंजीवन सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी, कीर्तनकार यांनी धाकट्या आषाढीच्या वारीला पंढरपूरात यावे, अशी विनंती प्रसिद्धी माध्यमाद्वारे करण्यात आली आहे. यानिमित्ताने कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे राहील.
आषाढ वद्य त्रैयोदशी, दि. 15 जुलै 2023, सकाळी 11 वाजता संत कैकाडी महाराज पालखी संत नामदेव महाराज महासंजीवन समाधी महाद्वार कडे प्रस्थान, महाद्वार येथे पंचपदी संत नामदेव महाराज यांची महाआरती, गुलाल पुष्पवृष्टी होऊन पुन्हा पालखी संत कैकाडी महाराज मठाकडे मार्गस्थ होईल. मठामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप व भोजन होईल. या सोहळ्याचे
निमंत्रक ह.भ.प. भारत महाराज जाधव (कैकाडी महाराज वंशज, मठाधिपती.) आहेत.

“नामदेव महाराज महासंजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मी पंढरपूरला जातो आहे. तुम्हीही या! नामदेव महाराज यांच्या वारीची वहिवाट सुरू करुया!” असे आवाहन शामसुंदर महाराज सोन्नर यांनी अकलूज वैभव न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून केले आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.