ब्रुटस यु टू…… मग सिझर तुला मेलच पाहिजे!

ब्रुटस यु टू……
मग सिझर तुला मेलच पाहिजे!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State India.
Mo. 9860959764.
मुंबई दिनांक 04/07/2023 :
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात, विषेत: राष्ट्रावादी काँग्रेस फुटीच्या निमित्ताने जे सुरु आहे त्याला एकच संबोधन देता येईल, खेळ खंडोबा आणि बघ बिरूबा!
हे पाहिल्यावर असे वाटते कीं, सध्याच्या राजकारणात नीतीमत्ता शिल्लक राहिली नाही. आदर्शवाद तर खूप लांबची गोष्ट साहेब. सत्तेसाठी वाट्टेल ते, हेच राजकारण्यांच तत्व आणि बाणा आहे. लाल दिवा यांचा श्वास आहे. हां दिवा थोडा बाजूला झाला कीं, यांचा जीव कासावीस होतो, गुदमरतो.
रोम हां त्याकाळतील लोकशाही देश होता. राजेशाहिला तिथे थारा नव्हता. रोमचा जगज्जेता लोकनेता ज्यूलीयस सिझर याने रोमन लोकांना जग जिंकून दिलं होतं. त्यामुळे सिझर रोम मध्ये एवढा लोकप्रिय झाला होता कीं, त्याला लोकांनी सम्राट केलं असत. किंवा तो स्वतः सम्राट झाला असता तरी लोकांनी त्याला मोठ्या आनंदाने सम्राट म्हणून स्वीकारला असता.
सिझरचं स्वतःच एक मंत्रिमंडळ होतं. त्यातील सर्वं मंत्री सिझरने घडवीले होते. त्यांना मोठं मोठी पद बहाल केली होती. हे सर्वं मंत्री सिझरसी एकनिष्ठ होते. त्यात ब्रुटस नावाचा एक तरुण योद्धा होता. ब्रुटस हां सिझरचा मानसपुत्र होता. तो सिझरचा जीव कीं प्राण होता. आपल्या नंतर रोमची सूत्र ब्रुटसच्या हातात जावी अशीच सिझरची मनोमन इच्छा होती.
पण ब्रुटससह सर्वं मंत्रिमंडळ सिझरची लोकप्रियता पाहून घाबरलेले असतात. त्यांच्या मनात भीती उत्पन्न होते कीं, सिझर जर राजा झाला तर मग रोमची लोकशाही संपुष्टात येईल. म्हणून मग सर्वं मंत्रीमंडळाने सिझरच्या हत्येचा कट रचला.
एके दिवशी सिझर निशस्त्र बेसावध असताना त्याचे सर्वं विश्वासू लोकं त्याला घेरतात आणि कट्यारीचे सपासप वार करतात. सिझर हे सगळं उघड्या डोळ्यांनी पहात असतो. त्यातून त्याला विशेष दुःख होतं नाही. पण सर्वात शेवटी ब्रुटस येऊन सिझरवर वार करतो तेंव्हा मात्र सिझर अत्यंत व्यथित होतो आणि म्हणतो, ब्रुटस यु टू, मग सिझर तुला मरावच लागेल.
असच काहीस रविवारी दुपारच्या शपथ विधित दिसत होतं. Ncp त बंडखोरी झाली होती. अजितदादा, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, धर्मरावंबाबा आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली होती. यांच्या नेतृत्वस्थानिक होते, ज्येष्ठ नेते, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. या गर्दीतील, धनंजय मुंढे आणि अनिल पाटील हे अजित पवार निष्ठ सोडले तर बाकीचे सर्वंचं शरद पवार निष्ठ आहेत. ही सर्वं माणसं शरद पवारांची आहेत. ही अजितदादाची माणसं नाहीत. त्याचं लोकांनी कट्यारी उपसल्या वर हे सर्वं अद्भुत आणि चमत्कारी वाटले. यातील भुजबळ साहेब तर भावी मुख्यमंत्री पदासाठीचे अजितदादाचे स्पर्धक आहेत. तरी ते एकत्र आले. शरद पवार साहेबानी वसंतदादा पाटील यांच्या काळात एक कट्यारिच झाड लावल होतं. त्याला आता असंख्य कट्यारी आल्या होत्या.
हे तेच पुणे आहे जिथे इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. 18 व्या शतकात मराठा साम्राज्याचे प्रधान पेशंवे नारायणराव (पुतण्या) पेशंवे यांचा खून राघोबादादा(काका) यांनी केला आणि सत्ता मिळविली. यावेळी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे सत्ताधारी होते.
काल जे काही राजकारण नाट्य घडले तेही पुण्यातचं घडले. सत्ता फडणवीस शिंदे यांचीच आहे. भांडण काका पुतण्याचच आहे. पण घटना थोडी उलट आहे. इतिहासात काकाने पुतण्यावर मात केली होती तर वर्तमानात पुतण्याने काकावर मात केल्याच सध्याचं तरी चित्र आहे.
पहाटेचा शपथविधी झाला तेंव्हा एकटे फडणवीस होते तर दुपारच्या शपथ विधीलां फडणवीसांच्या जोडीला शिंदे होते. म्हणून पहाटेच्या शपथविधी पेक्षा दुपाराचा शपथ विधी अधिक प्रभावी झाला.
इतिहास साक्षी आहे. नारायणरावाच्या खुना नंतर नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी हात मिळवणी केली त्यात बारभाई सामील झाले आणि मराठा सम्राज्यावर 25 वर्ष बिन दिक्कत राज्य केले. हां इतिहास आहे. पण इतिहास काळातील शिंदे फडणवीस यांच्या सोबत राम शात्री प्रभुणे हे न्यायधीश होते तसें वर्तमान काळातील शिंदे फडणवीस यांच्या सोबत कोणी प्रभुणे दिसत नाहीत. हां मोठा गुणात्मक फरक आहे. शेवटी रोम असो कीं, मराठा साम्राज्य असो, इतिहासाची पुनःरावृत्ती होतेच. चांगला असो वा वाईट असो सिझरचा शेवट त्याचाचं ब्रुटस करतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे. ते कोणालाही पुसून टाकता येणार नाही.
या बंडाची झळ महा विकास आघाडीला पोहचली हे खरं आहे पण महायुतीलाही त्रास होणार आहे हे निश्चित. बघू या पुढच्या लेखात.
बापू हटकर
राजकीय विश्लेषक