रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 28/6/2023 :— शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री हनुमान विद्यालय लवंग येथे श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या 21 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी व पुणे जिल्हा असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ब्रांझ पदक मिळाल्याबद्दल तृप्ती गेजगे हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्रा डॉ. जनार्धन परकाळे यांच्या हस्ते श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशाला समितीचे सभापती विजयराव पाटील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धनाजी चव्हाण, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी संजय बडे, वैजिनाथ वाघ, तुकाराम चव्हाण, धनाजी भोळे, विद्यालयाचे प्राचार्य शिर्के आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रा जनार्धन परकाळे व संजय बडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावी मधील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी भिलारे हिने आक्कासाहेबांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले तर सूत्रसंचलन सौ.शेख आणि सांस्कृतिक प्रमुख खंडागळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार शिक्षक प्रतिनिधी भोसले यांनी मानले तर अनुमोदन आतार यांनी दिले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.