भगीरथ भालकेंच्या BRS प्रवेश निश्चितेने राष्ट्रवादीला धक्का
भगीरथ भालकेंच्या BRS प्रवेश निश्चितेने राष्ट्रवादीला धक्का
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 25/6/2023 :
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर मोठा धक्का बसला आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी आपण २७ जून रोजी भारत राष्ट्र समिती (बीएसआर) या पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. अभिजीत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षात सुरू झालेल्या घडामोडींना अखेर मूर्त रूप आले आहे.
पंढरपूर (Pandharpur) येथील भालके समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतनंतर भगीरथ भालके यांनी ही माहिती दिली. भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या बीआरएस प्रवेशामुळे राष्ट्रवादीला (NCP) मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांनी पोटनिवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेतली आहेत. त्यामुळे भालके यांच्या पक्ष सोडण्याचे परिणाम पंढरपुरात आगामी निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठविले होते, त्या विमानाने जाऊन भालके यांनी केसीआर यांची हैदराबाद येथे जाऊन चर्चा केली हेाती. त्यानंतर भालके यांच्या बीआरएसमध्ये जाण्याची शक्यता बळावली होती. आज भालके यांनी अधिकृत बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयाचे पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने 27 जून रोजी पंढरपूरला येणार आहेत. या दरम्यान सकाळी सरकोली येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.