आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणप्रेरकमहाराष्ट्रसामाजिक

ग्रीन फिंगर्स आयुर्वेदीक हॉस्पिटलचे वारकऱ्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ग्रीन फिंगर्स आयुर्वेदीक हॉस्पिटलचे वारकऱ्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 25/6/2023 :
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट शंकरनगर अकलूजच्या उपाध्यक्षा व सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनपर ग्रीन फिंगर्स आयुर्वेदीक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या हॉस्पिटल यांच्या वतीने आषाढी वारी पालखी सोहळ्यात अकलूज व सदशिवनगर या ठिकाणी 23 जून व 24 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले.

सदर शिबिराच्या माध्यमातून आषाढी वारीतील ४१० भाविकांवर मोफत उपचार करण्यात आले.अकलूज मधील शिबीर हे शिवरत्न मोटर्स येथे आणि सदाशिवनगर येथील शिबिर हे शंकर सहकारी साखर कारखाना गेस्ट हाऊस येथे घेण्यात आले होते.या शिबिरास पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
ग्रीन फिंगर्स आयुर्वेदीक हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे तपासण्या घेवुन तसेच प्रत्यक्ष हॉस्पिटल मधील उपचाराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत आरोग्य विषयक सोयी सुविधा देण्याचे विधायक कार्य करीत आहे. अशी माहिती
श्री शिव-पार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शंकरनगर च्या जनसंपर्क विभागाने दिली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.