आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणप्रेरकमहाराष्ट्रसामाजिक

ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल मध्ये सुवर्णप्राशन शिबिरात 215 बालकांनी घेतला लाभ.

ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल मध्ये
सुवर्णप्राशन शिबिरात 215 बालकांनी घेतला लाभ.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State India.
Mo. 9860959764.

(आकाश भाग्यवंत नायकुडे यांज कडून)

मुंबई दिनांक 21/6/2023 :
श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट शंकरनगर अकलूज ट्रस्ट संचलित ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल मध्ये पुष्य नक्षत्रावर सुवर्णप्राशन शिबिरात 205 बालकांनी लाभ घेतला.या शिबिराचे उदघाटन विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली आरोग्यविषयक सोयी सुविधांची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून माजी उपमुख्यमंत्री
विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट शंकरनगर अकलूज या ट्रस्टने ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे हॉस्पिटल सुरू केले आहे. सदर हॉस्पिटलच्या माध्यमातून ऑक्टोंबर 2022 पासून परिसरातील व तालुक्यातील रुग्णांवर ठराविक उपचार मोफत केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हॉस्पिटलने प्रत्येक पुष्य नक्षत्राच्या दिवशी 0 ते 12 वर्षा पर्यंतच्या बालकांना दिले जाणारे सुवर्णप्राशन मोफत मध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात 21 जून रोजी सकाळी 10:00 ते सायं. 05:00 या वेळेत “सुवर्णप्राशन शिबिर” घेऊन केली. सदर शिबिराचे उद्घाटन विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या शिबिरामध्ये परिसरातील 215 बालकांनी मोफत सुवर्णप्राशना चा लाभ घेतला.


सुवर्णप्राशन हे प्रामुख्याने प्रतिकारशक्ती, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिले जाते. तसेच वारंवार होणारे आजार कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.

सुवर्णप्राशन मुलांना सकाळी प्रत्येक पुष्य नक्षत्रावर किमान एक वर्ष दिले जाते. संस्था पुढील एक वर्ष प्रत्येक पुष्य नक्षत्राच्या दिवशी मोफत सुवर्णप्राशन शिबिर घेणार आहे. अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.


मोफत सुवर्ण प्राशन शिबीराच्या आगामी तारखा या पुढील प्रमाणे आहेत. 18 व 19 जुलै 2023, 14 ऑगस्ट, 12 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर, 8 नोव्हेंबर, 2 व 29 डिसेंबर 2023
सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये संस्थेचे विश्वस्त, अधिकारी, सर्व डॉक्टर व स्टाफ यांचे मोलाचे योगदान राहिले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button