सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 21/01/2026 :
न्यू सातारा पॉलिटेक्निक पंढरपूर या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पार पडलेल्या “जॅबिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे” या नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डिप्लोमा इलेक्ट्रिकल विभागातील अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या कु. कोमल रागडे, कु. समृद्धी कुलकर्णी, कु. दीक्षा लोंढे कु. सुप्रिया भिंगारदिवे कु. रसिका भादुले, कु. वैष्णवी आगलावे व कु. श्रुतिका जाधव या विद्यार्थ्यांची “जॅबिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे” या नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदर निवडीबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सागर कांबळे व प्रा. पल्लवी फुले तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.
