ताज्या घडामोडी

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वेटलिफ्टिंग व रेसलिंग स्पर्धा संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वेटलिफ्टिंग व रेसलिंग स्पर्धा संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/01/2026 :
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महावि‌द्यालयामध्ये महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) इंटर इंजिनिअरिंग स्टुडन्ट स्पोट्र्स असोसिएशन अंतर्गत सी झोन विभागातील वेटलिफ्टींग व कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली दि. २२.०१.२०२६ रोजी पार पडल्याची माहिती महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यानी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, सदर स्पर्धेसाठी विभागातील १० महावि‌द्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टींग तर ३८ वि‌द्यार्थ्यांनी कुस्ती या क्रिडा स्पर्धेत सहभाग नोंदविला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य वसंत पांडुरंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उ‌द्घाटन करण्यात आले. रेसलिंग या स्पर्धेमध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड रिसर्च, शंकरनगर अकलूज मधील ‌द्वितीय वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी चि. संस्कार नागनाथ चव्हाण हा ७४ किलो वजनी गटामध्ये प्रथम तर ८६ किलो वजनी गटामध्ये तृतीय वर्ष संगणक विभागामधील विद्यार्थी चि. शिवतेज विक्रमसिंह माने देशमुख द्वितीय आला आहे. तसेच वेटलिफ्टिंग या स्पर्धेमध्ये ९४ किलो वजनी गटामध्ये तृतीय वर्ष संगणक विभागामधील विद्यार्थी चि. शिवतेज विक्रमसिंह माने देशमुख याने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. विजेत्या विद्यार्थ्याचे महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य वसंत जाधव व महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी विशेष कौतुक केले.
सदरील स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रीडा समन्वय प्रमुख प्रा. रविकांत देशमुख व शुभम यादव तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button