ताज्या घडामोडी

विचारधारा

विचारधारा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 19/01/2026 :
आपल्या प्रत्येकाला आपले घर छान असावे, फर्निचर, रंग-रंगोटी सगळे कसे छान असावे असे वाटते. एखाद्या पाहुण्यांच्या किंवा मित्राच्या घरी जाऊन आलो की आपले पण घर तसे असावे असे वाटते.
छान घर म्हणजे काय? भरपूर खोल्या असलेले, मोठे अंगण, बाग-बगिचा, झोका, दारात छान गाड्या वगैरे म्हणजे छान घर का? साधे कौलारू, सावरलेले अंगण, दारात गाई-गुरे असे घर छान नसते का?
मुलांनो, खरे सांगू का, मोठे घर-लहान घर असे काही नसते. घर कसेही असुद्यात त्यात राहणारी माणसे कशी आहेत ते महत्वाचे. प्रेमळ, जीव लावणारी व एकमेकांना समजून घेणारी माणसे ज्या घरात राहतात ते घर चांगले; होय की नाही?
आपले घर छान बनवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button