आय.डी.बी.आय. बँक शाखा अकलूज तर्फे अकलूज ग्रामीण रुग्णालयास एक लाख रुपयांचे साहित्य भेट
आय.डी.बी.आय. बँक शाखा अकलूज तर्फे अकलूज ग्रामीण रुग्णालयास एक लाख रुपयांचे साहित्य भेट
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 06/01/2026 :
पत्रकार दिनाचे औचित्य साधूनआय.डी.बी.आय. बँक शाखा अकलूज तर्फे अकलूज ग्रामीण रुग्णालयास एक लाख रुपयांचे रुग्णोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. याप्रसंगी अकलूज ग्रामपंचायत माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, अकलूज ग्रामीण रुग्णालय अधीक्षक बापू ओव्हाळ, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, आयडीबीआय बँक शाखा अकलूज चे असिस्टंट जनरल मॅनेजर राकेश अगस्ती, सेल्स एक्झिक्युटिव्ह अजय विजय पवार, माळशिरस तालुक्यातील तालुक्यातील पत्रकार आणि बँक कर्मचारी उपस्थित होते.
आयडीबीआय बँकेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रुग्णांसाठी ब्लू स्टार कुलर, ऑपरेशन टेबल, रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्या, स्टूल तसेच ऑपरेशन साठी लागणारे सर्व साहित्य असे सुमारे एक लाख रुपये किमतीचे साहित्य ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे. असाच आदर्श अकलूज परिसरातील अन्य बँकांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी किशोरसिंह माने पाटील यांनी केले. अकलूज ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने बँक प्रतिनिधींचा येतोचित सन्मान करण्यात आला.

