लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 04/01/2026 :
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लोकायत लोकसंचलित साधन केंद्र अकलूज या संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कश्मिरा लोहकरे (रत्नपारखी), लोकायत लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष व अकलूज नगरपरिषदेच्या नूतन नगरसेविक सौ.प्रतिभा विलासनंद गायकवाड उपस्थित होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यानंतर इतनी शक्ती हमे देना दाता ही प्रार्थना घेण्यात आली.लोकायत लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष सौ.प्रतिभा गायकवाड यांनी आपले मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली होती.त्यामुळे आज शैक्षणिक क्षेत्रात मुलींची प्रगती झाली आहे व सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.त्यानंतर डॉ. कश्मीरा लोहकरे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा इतिहास सांगत महिलांना आरोग्य, हेल्थ,स्किन,हॆअर याविषयी मार्गदर्शन केले. जयमाला सगर यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका सौ.कामिनी ताटे-देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सांगितला.
या कार्यक्रमासाठी सचिव संगीता गडदे तसेच सर्व लोकायत लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत या कार्यकारणी व CRP,क्षेत्र समन्वयक,लेखापाल,व व्यवस्थापक उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये बालविवाह रोखण्याबाबत उपस्थित सर्व प्रार्थना ( शपथ) घेतली.
