रोटरी क्लब अकलूज, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर व सर्व संस्थाच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन
रोटरी क्लब अकलूज, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर व सर्व संस्थाच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/01/2026 :
रोटरी क्लब अकलूज आणि दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर व सर्व संस्थाच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कृष्णा विश्व विद्यापीठ कराड च्या कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कराड यांच्या सहकार्याने होणाऱ्या मोफत कर्करोग निदान शिबिराचे उद्घाटन गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी दहा वाजता गेस्ट हाऊस माळीनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगर चे माजी मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप भगवंतराव जाधव यांच्या हस्ते आणि दि. सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर चे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गणेश ज्ञानदेव इनामके, शुगरकेन प्रोड्यूसर विविध कार्यकारी सोसायटी माळीनगरचे चेअरमन अमोल शंकरराव ताम्हाणे, दि. सासवड माळी एज्युकेशन सोसायटी माळीनगर चे सेक्रेटरी अजय मधुकरराव गिरमे, माळीनगर ग्रामपंचायत सरपंच सौ. अनुपमा अनिल एकतपुरे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष केतन बोरावके आणि सचिव अजिंक्य जाधव यांनी दिली.

