सहकार महर्षि पदविका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षा २०२५ मध्ये उत्तुंग यश

सहकार महर्षि पदविका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षा २०२५ मध्ये उत्तुंग यश
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 06/01/2026 :
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पदविका हिवाळी परीक्षा २०२५ मध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असल्याचे माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली.
पदविका अभियांत्रिकीच्या सर्व शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून ९९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत.
कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थी कु. भक्ती माने-देशमुख (८६.७१), तसेच संयुक्तपणे चि. अथर्व उघडे (८५.४१) व प्रणिती रासकर (८५.४१) द्वितीय तर संयुक्तपणे कु.साक्षी देवकर (८१.२९%) व अमृता केचे (८१.२९%) तृतीय क्रमांक मिळविला आहे.द्वितीय वर्षातील विद्यार्थी कु. शेख माहिवेश (९०.४७%), कु. जाधव पायल (८९.२९%), चि. तलवार आप्पासाहेब (८५.७७%) तृतीय वर्षातील विद्यार्थी कु. पेटकर श्रद्धा (९६.१२%), कु. माने-देशमुख स्वरांजली (९५.५३%), कु. पवार वैष्णवी (९४.२४%), या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थी चि. सागर शिंदे (८८.८७%), चि.वाहिद मुलाणी (८३.६५%), चि. आर्यन कोकरे(८१.०६%), द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि. रितेश वाघ (८५.६७%), चि. वेदांत निकम (८२.८९%), चि. रेहान शेख(८०.३३%), तृतीय वर्षातील विद्यार्थी श्री. गोविंद फुले (८५.८८%), चि. शाहीद मुलाणी (८३.७६%), कु.क्रांती एकतपुरे (८२.३५%) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला.
इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थी चि. सादिक मुलाणी (८०.७१%), तसेच संयुक्तपणे चि. आर्यन टोनपे (७८.३५%) व चि. स्वराज बंडगर (७८.३५%) द्वितीय क्रमांक मिळविला तर राज शेळके (७७.०६%) तृतीय क्रमांक मिळविला आहे.द्वितीय वर्षातील विद्यार्थी कु. तनिष्का काळे(८२.१२%), चि. शिवम कवितके (८१.०६%), ज्योती साठे(७९.५३%) तृतीय वर्षातील विद्यार्थी चि. आदित्य र सालगुडे-पाटील (९५.०६%), चि. वैष्णव बोराडे (९२.९४%), कु. वैष्णवी आगलावे (९२.८२%),या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तुतीय कमांक मिळविला.
सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थी कु.ऋतुजा मगर (८४.५९), कु. तृप्ती शिंदे (८२.४७), चि. अनुप जाधव(८०.००%) द्वितीय वर्षातील विद्यार्थी कु. श्रुती भोसले(८६.९४%), चि. धीरज विरकर (८५.१८%), कु.करगळ सोनाली(७९.८८%) तृतीय वर्षातील विद्यार्थी चि. जयराज भिंगारदिवे (८०.११%), कु. माने-देश्मुख स्वरांजली (७९.११%), कु. साठे श्रावणी (७८.११%) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तुतीय कमांक मिळविला.
प्रथम वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थी कु. कोतमिरे सृष्टी (९२.९४%), कु. कदम श्रावणी(९०.३५%) व कोतमिरे क्षिती(८८.९४%) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तुतीय कमांक मिळविला.
प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थी कु. श्वेता मोरे (८३.२९%) प्रथम क्रमांक, तसेच संयुक्तपणे कु. सृष्टी चव्हाण व आकाश वाकसे(८२.७१%) द्वितीय क्रमांक व विराज सरवदे(८२.३५%) तृतीय क्रमांक मिळविला आहे.
महाविद्यालयाचे ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील ट्रस्टचे सचिव श्री राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

