ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 04/01/2026 :
आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टी आवडत असतात. काही गोष्टी तर आपण जिवापाड जपतो. आपले पुस्तक, वही इतकेच काय अगदी पेन सुद्धा कोणी घेतलेला आवडत नाही.
हे झाले वस्तूंचे, व्यक्तींच्या बाबतीत पण तसेच असते. अगदी लहान असल्या पासून माझी आई, माझे बाबा, माझा दादा हा माझाच असतो. दुसरे कोणी माझा म्हटले तर आपल्याला चालत नाही.
मुलांनो, मोठे झालात तरी शेवटपर्यंत माझे ही ओढ कायम ठेवा, नाती जपा. त्यांना कायम तुमचे प्रेम द्या. आपलेपणा तितकाच ठेवा. वस्तू असो वा व्यक्ती आपुलकीने जपा. त्यांना दूर लोटू नका, झिटकारू नका.
सौ. स्नेहलता स. जगताप.

