मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 04/01/2026 :
दैनंदिन जीवनात आपण उठल्यापासून झोपेपर्यंत उत्साहाने अनेक गोष्टी करत असतो. आपले अथक प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवतात. आपला उत्साह वाढतो आणि आपण अजून जोमाने प्रयत्न करतच राहतो.
पण एक दिवस येतो, आपल्याला या सर्व गोष्टींचा कंटाळा येतो. ‘आता बास’ असे वाटते, शरीराबरोबर मनही थकते. मनाची उभारी कमी होते, क्वचित नैराश्यही येते.
अर्थात हा कंटाळा येणे हे नव्या सुरुवातीचे लक्षण असते, तो तात्पुरता असतो. शरीराला व मनाला थोड्याशा विश्रांतीची गरज असते. नव्या सुरुवातीची ती पहाट असते. पुन्हा नव्या जोमाने सुरू होणाऱ्या कार्यासाठीची पूर्वतयारी असते.
आजचा संकल्प
कंटाळा या गोष्टीकडे आपण सकारात्मक नजरेने पाहू. कंटाळा आला आहे हे मान्य करू, तो काळ एन्जॉय करू व पुढील ध्येय उत्साहात पूर्ण करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

