मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 04/01/2026 : कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात करावी असे म्हणतात. आहार असो वा विहार प्रमाणातच हवा. बोलणे प्रमाणातच हवे. अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
हल्ली आहार म्हणजे खात राहणे. भुकेसाठी कमी व जिभेचे लाड पुरवण्यासाठी जास्त. त्यामुळे बाहेरचे खाण्याकडे कल वाढला आहे. रस्त्यावरची गाडी असो, टपरी असो, हॉटेल असो वा पंचतारांकित असो.
आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळे रंग, चवीसाठी चव वाढवणारी रसायने, पदार्थ तयार करतानाची अस्वच्छता अन् बरेच काही अनारोग्यदायी गोष्टी असतात. कधीतरी ठीक पण नियमित बाहेरचे खाणाऱ्यांनी हा विचार करावा.
आजचा संकल्प
घरात तयार केलेले, बाहेरच्यासारखे आकर्षक दिसत नसले तरी आरोग्याला चांगले असलेले, साधे पण पौष्टिक जेवण करू व आरोग्याची काळजी घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

