माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता ओहोळ

माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता ओहोळ
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
माळशिरस दिनांक 03/01/2026 :
माळशिरस नगरपंचायतीच्या. नगराध्यक्ष म्हणून प्राजक्ता शिवशंकर ओहोळ यांची निवड करण्यात आली मावळते नगराध्यक्ष विजय देशमुख यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगर अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज नगरपंचायत कार्यालयात सांगोला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती या सभेमध्ये प्राजक्ता ओहोळ यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी त्यांना बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून घोषित केले यावेळी सहाय्यक म्हणून माळशिरसचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी काम पाहिले
या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ आप्पासाहेब देशमुख अर्चना देशमुख विजय देशमुख पुनम वळकुंदे तुकाराम देशमुख महादेव देशमुख रावसाहेब देशमुख शिवाजीराव देशमुख आबा धाईंजे रघुनाथ चव्हाण महादेव कोळेकर बबन शिंदे प्रवीण केमकर अजीनाथ वळकुंदे ताई वावरे मंगल गेजगे धनाजी देवकर पिंटूभाऊ खरात प्रदीप हेळकर मनोज गायकवाड प्रशांत वाघमोडे गणेश कुलकर्णी संतोष वाघमोडे माळशिरस शहरातील व प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते
माळशिरस नगरपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण आहे परंतु डॉ आप्पासाहेब देशमुख यांनी प्राजक्ता ओहोळ यांना नगराध्यक्ष करण्याचा दिलेला शब्द पाळत एस सी कॅटेगिरीत असलेल्या प्राजक्ता ओहोळ यांना माळशिरस सारख्या शहराच नगराध्यक्ष केले
