सहकार महर्षि पदविका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश

सहकार महर्षि पदविका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 04/01/2026 :
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पदविका हिवाळी परीक्षा 2025 मध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असल्याचे माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली.
त्यामध्ये प्रथम वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग विभागातील विद्यार्थिनी कु. श्रावणी दिपक कदम हिने बेसिक मॅथ्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
महाविद्यालयाचे ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

