भाळवणी येथे ग्राहक प्रबोधन शिबिर संपन्न

भाळवणी येथे ग्राहक प्रबोधन शिबिर संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
भाळवणी/प्रतिनिधी दिनांक 03/01/2026 : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका पंढरपूरच्या वतीने ग्राहक पंधरवडा निमित्त ग्राहक प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक बिंदू माधव जोशी यांच्या प्राणिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणजीत जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत प्रांत सहसचिव दीपक इरकल व उपसरपंच नितीन शिंदे होते.
यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, डॉ .नवनाथ खांडेकर,जिल्हा सदस्य पांडुरंग आल्लापूरकर तालुका सदस्य ॲड.अंकुश वाघमारे, शहाजी जाधव, विशाल म्हेत्रे लिंगे, महावितरण चे लाईनमन पांडुरंग साळपे, पाटबंधारे विभागाचे विजय राऊत, कृषी सहाय्यक अधिकारी सागर गव्हाणे,राहुल ताटे,सुहास पाटील, संजय पाटील,दामोदर देशपांडे,बबलू पाटील,आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दिपक इरकल म्हणाले की ग्राहक पंचायत ही लोक चळवळ आहे..ग्राहक जागृत होत आहे. ऑनलाईन व्यवहारामुळे ग्राहकांना अडचणी येत असल्याने जुन्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये सुधारणा करून नवीन कायदा 2019 मध्ये आणला . याची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची (CCPA) स्थापना, ज्याद्वारे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींवर कारवाई करता येते, ई-कॉमर्सचा समावेश, ग्राहकांना अधिक अधिकार देणे (सुरक्षा, माहिती, निवड, सुनावणी, निवारण, शिक्षण), उत्पादन दायित्व (Product Liability) ची तरतूद आणि तक्रार निवारणासाठी सुलभ प्रक्रिया (जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर). तसेच शेतकरी, उत्पादन दुकानदार, उत्पादक, ग्राहक या पाच गोष्टी वर लक्ष दिले जात आहे. असे ही इरकल यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच नितीन शिंदे म्हणाले की ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती मिळाली. ग्राहक हक्क विषयी माहिती मिळाली.यापुढे ही ग्रामपंचायत कार्यालय कडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.
यावेळी तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी ग्राहक पंचायतीचे पार्श्वभूमी सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशपांडे यांनी केले.तर प्रास्ताविक व आयोजन प्रशांत माळवदे यांनी केले.तर आभार शशिकांत देशपांडे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हर्षद गवळी,कल्याण गवळी, विलास लाले, राहुल शिंदे,योगेश जाधव,दादा गवळी यांनी प्रयत्न केले. यावेळी ग्राहक, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
