
मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 29/12/2025 :
अनेकदा जीवनात असे काही प्रसंग येतात की आपण हतबल होतो. काय करावे सुचत नाही. माझ्याच बाबतीत असे का ते समजत नाही.अशा वेळेस दुःख करत न बसता सगळे बाजूला सारून, झटकून त्यातून बाहेर पडावे असे वाटत असतानाही परिस्थिती मजबूर बनवते.
अशा प्रसंगी मनस्थिती कणखर ठेवणे गरजेचे असते. स्वतःची बुद्धी, सहनशक्ती व निर्णयक्षमता यांच्या जोरावर आपण परिस्थिती वर मात करू शकतो. थोडे थांबून, दुप्पट जोर लावून नव्याने सुरुवात करता येते.
आपण कधीच स्वतःला दुर्बल समजायचे नाही. स्वशक्ति जागृत ठेवायची. स्वतःला सतत पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करायचे अन् आत्मविश्वासाने स्वतःकडे पहायचे. आपणच आपल्याला सावरायचे.
आजचा संकल्प
कोणी मदतीला येईल, मदतीचा हात देईल, सहानुभूती दाखवेल या आशेवर न राहता आपले आपण स्वतःच कणखरपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी उभे राहू व यशस्वी होऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

