विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 28/12/2025 :
आपण जसजसे मोठे होत जातो तसे आई-वडील, शिक्षक यांची बंधने, नियम, चौकशी, अटी असे नको वाटते. आम्ही आता लहान आहोत का? सारखेच का तुमचे ऐकायचे? सगळे तुम्हाला विचारून-सांगून करायचे? असे बंडखोरी विचार मनात येतात… होय ना?
राग येतो मोठ्या माणसांचा. कधी एकदा आपण पण मोठे होऊ असे वाटू लागते. आपले निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत असे वाटू लागते. इतर मित्रांशी तुलना केली तर मग आपले जास्तच वाईट वाटते.
पण मुलांनो, आई-वडिलांचे हे सुरक्षा कवच असते. आपल्या मुलाला वाईट संगत लागू नये, तो जीवनाच्या योग्य मार्गाने चालावा असेच प्रत्येक पालकांना व गुरुजनांना वाटत असते. त्यांच्या समवेत तर आपण घडत असतो.
नारळाची कठीण कवटी तर आतील मऊ खोबरे व मधुर पाणी सुरक्षित ठेवते ना? ती नसती तर?
- सौ. स्नेहलता स. जगताप.

