ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 29/12/2025 :
आपल्याकडे आपल्या पेक्षा मोठ्या, जेष्ठ मंडळींना खाली वाकून, पायाला स्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत आहे. मोठ्या व्यक्ती पण आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात, शुभ चिंततात.
मोठा हो, म्हातारा हो, यशस्वी हो. असा आशीर्वाद देतात. यामुळे आपल्यामध्ये पण मानसिक कणखरपणा येतो. चांगले वागणे, बोलणे, चांगले होणे याकडे विचार परावर्तित होतात.
मुलांनो, कोणाविषयी मनात आकस ठेवू नका. कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले तरी त्यांच्या बद्दल वाईट विचार करू नका. मोठ्यांच्या बद्दल नेहमी आदर करावा.आपले सकारात्मक विचार आपल्याला चांगले वागण्यास प्रवृत्त करतात.
मोठ्यांचे आशीर्वाद व आपले वर्तन यामधून एक चांगले चारित्र्य घडते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

