मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 30/12/2025 :
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला अनेक सुविचार, सुभाषिते ऐकायला, वाचायला मिळतात. त्यातील अनेक आपल्या मनाला भावतात. ते विचार सकारात्मक वाटतात.
विचार नुसते आवडून उपयोग नसतो. आपल्याकडून तशा कृतीची गरज असते. दुसऱ्यांना मदत करावीशी वाटणे व प्रत्यक्ष करणे यामध्ये फरक आहे. त्यामुळे आवडलेले विचार प्रत्यक्षात जगणे आवश्यक आहे.
अगोदर स्वतःला बदलवू. आपण सर्वांनी जर त्यादृष्टीने स्वतःमध्ये बदल केला तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. प्रत्येकामधील सकारात्मक बदल आपल्याला सार्वजनिक बदल घडवून दाखवेल.
आजचा संकल्प
नवीन वर्षाचे संकल्प करताना, आवडलेला विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा एक साधा पण महत्त्वाचा संकल्प करू व आपण प्रत्येकजण एक अर्थपूर्ण जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

