ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 30/12/2025 :
आज तुमच्याशी विशेषतः मुलींशी थोडे स्पष्ट बोलणार आहे. आपल्याकडे घरात जरी मुलगा व मुलगी असा फरक करत नसले तरी समाजात मुलींच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
मुलगा-मुलगी हा फरक निसर्गानेच केला आहे. मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर होते तर मुलांचे पुरुषांमध्ये. मुलींनी स्त्रीत्व जपायचे असते. स्त्रीपणाचे प्रदर्शन नको तसे मुस्कटदाबी पण नको.
मुलीनो, आपले स्त्रीपण जपत आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. स्वतःला कोंडून घेऊ नका पण स्वैरपणा पण नको. आपले सामर्थ्य कळाले पाहिजे तशा आपल्या मर्यादा ओळखता आल्या पाहिजेत.
आई-वडील, गुरुजन यांच्याकडून संस्कार घ्या, संयम शिका व स्वतःला घडवा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

