ताज्या घडामोडी

रोटरी क्लब अकलूज च्या वतीने “राष्ट्र निर्माण पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न

रोटरी क्लब अकलूज च्या वतीने “राष्ट्र निर्माण पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 30/12/2025 :
हल्लीच्या काळात संवादापासून आपण दूर जात आहोत. संवादामुळे विद्यार्थ्यांशी जवळीक साधता येत असल्याने चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी ज्ञानार्जन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणे गरजेचे असल्याचे मत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी शैक्षणिक कार्य करणाऱ्या “एकलव्य न्यास” या संस्थेच्या अध्यक्षा रेणूताई गावस्कर यांनी याप्रसंगी व्यक्त करत उपस्थितांना मूल्याधिष्ठित शिक्षण, समाज जडणघडणीत शिक्षकांची भूमिका आणि राष्ट्र निर्मितीतील त्यांचे योगदान यावर गुरुकुल पद्धती पासून ते सध्याची शिक्षण व्यवस्थेपर्यंत अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.


रोटरी क्लब अकलूज च्या वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात “राष्ट्र निर्माण पुरस्कार वितरण सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माळशिरस तालुका‌ गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो.केतन बोरावके, सचिव रो.अजिंक्य जाधव, प्रकल्प संचालक रो.स्वराज फडे, प्रकल्प प्रमुख रो. प्रवीण कारंडे, रोटरी सदस्य बबनराव शेंडगे, कल्पेश पांढरे, नवनाथ नागणे, जयदीप बोरावके, गजानन जवंजाळ, स्वप्निल शहा, गोमटेश दोशी, संदीप लोणकर, प्रियाताई नागणे, तेजस्विनी बोरावके, स्माईल एफएम अकलूजचे संचालक शंकर बागडे, प्रभाकर ननवरे तसेच माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षक वर्ग व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते.
यावेळी जि‌ल्हा परिषद शाळा पिसेवाडीच्या अवंती सिंदफळकर, जि.प. शाळा तुपेवस्ती येथील भाऊसो देशमुख, जि.प.शाळा तरंगफळचे नितीन पाटील, जि.प. शाळा गोरडवाडीचे रेवण भोसले, जि.प.शाळा कारूंडेचे शिवाजी पारधी, जि.प. शाळा नेवरे येथील संग्राम दळवी असे माळशिरस तालुक्यातील सहा बीट मधील सहा शिक्षकांना राष्ट्र निर्माण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके यांनी केले, सूत्रसंचालन सुहास उरवणे आणि रो. प्रवीण कारंडे यांनी केले तर आभार सचिव रो. अजिंक्य जाधव यांनी मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button