पुरुषोत्तम बैसकार “विदर्भ भूषण” पुरस्काराने सन्मानित

पुरुषोत्तम बैसकार “विदर्भ भूषण” पुरस्काराने सन्मानित
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
यवतमाळ, प्रतिनिधी 28/12/25 : राष्ट्संत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रसार व प्रचार करणारे पुरुषोत्तम बैस्कार मोझरकर, श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ हे वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या लेखणीचा प्रचार करतात. त्यांना विद्याभूषण फाऊंडेशन नागपूर द्वारे “विदर्भ भूषण 2025” हा पुरस्कार देऊन डाॅ. रमेश ठाकरे, डाॅ. प्रदीप आगलावे, नितेश कराळे वर्धा, संचालक डाॅ. भूषण भस्मे व श्रीमती पुजा भस्मे या मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले. पुरुषोत्तम बैसकार म्हणतात, या पुरस्कारातून पुढील कार्य करण्यास चालना, नवी ऊर्जा, प्रोत्साहन मिळते. विद्याभूषण फाऊंडेशन ही संस्था सर्वाना शिक्षण, रोजगार, समान संधी, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, वृक्षारोपण, गरीब गरजूंना मदत, विदर्भ भूषण पुरस्कार हे सर्व उपक्रम राबवित असते.
“विदर्भ भूषण” पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरुषोत्तम बैसकार यांचे सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, संपर्क व प्रसिद्धी प्रमुख नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी.) यांनी त्यांचे भ्रमणध्वनी वरून अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

