सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविदयालयातील विद्यार्थ्यांची “नेक्स्टियर ऑटोमोटिव्ह इंडिया”त निवड

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविदयालयातील विद्यार्थ्यांची “नेक्स्टियर ऑटोमोटिव्ह इंडिया”त निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/12/2025 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या “नेक्स्टियर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे” या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिप्लोमा मेकॅनिकाल विभागामध्ये अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या चि. प्रशांत मोरे, चि. शंभूराजे क्षीरसागर, चि. ज्ञानेश्वर झिंजूरडे, चि. शाहीद मुलाणी, चि. उदय चव्हाण कु. श्रद्धा सावंत, कु. चंदना लोकरे, कु. श्रेया म्हेत्रे तसेच इलेक्ट्रीकल डिप्लोमा विभागातील चि. महेश घाडगे, . रुहाण मुलाणी, चि. आदित्य सालगुडे-पाटील, चि. प्रज्योत तोरणे, कु. सुप्रिया भिंगारदिवे, व कु. वैष्णवी आगलावे या विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.
सदरील विद्यार्थ्यांना मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल निकम, इलेक्ट्रीकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सागर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले
तसेच समन्वयक म्हणून प्रा. धनवले एस.पी., प्रा. फुले पी. जी. आणि ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

