लोकायत लोकसंचलित साधन केंद्रातील पाच महिला नगरसेवक

लोकायत लोकसंचलित साधन केंद्रातील पाच महिला नगरसेवक
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/12/2025 :
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत लोकायत लोकसंचालित साधन केंद्र अकलूज या संस्थेच्या अध्यक्ष प्रतिभा गायकवाड व बचत गटातील इतर 4 सदस्य नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक या पदासाठी बहुमताने निवडून आले. माविम च्या दशसूत्री प्रमाणे आठवे सूत्र पंचायतराज संस्थेमध्ये सहभाग या सूत्राचा अवलंब करून व महिला सक्षमीकरणाची धुरा हातात घेतलेल्यांच्या कार्यास यश मिळाले व बचत गटातील महिलांनी नगरसेवक या पदासाठी अर्ज भरून त्यांनी महिला चूल आणि मूल हे सांभाळून समाजाची जनतेची सेवा करण्यामध्ये त्यांचाही खारीचा वाटा आहे हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले. बचत गटाच्या सहकार्याने तसेच मदतीने महिला कुठपर्यंत झेप घेऊ शकतात हे या निवडणुकीतून आपणास समजले असेलच… माविम हे महिला सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक आर्थिक आणि राजकीय गोष्टी बाबत ही महिलांना ज्ञान देत असते. त्यांच्या कलागुणांना वाव देण्याबाबत ही माविम काम करत असते. लोकायत लोक संचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक यांनी बोलताना सांगितले की मला खूप अभिमान वाटत आहे की लोकायत लोकसंचालित साधन केंद्रातील 5 महिला नगरसेवक या पदासाठी बहुमूल्य मतांनी निवडून आल्या. लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष प्रतिभा विलासनंद गायकवाड समृद्धी बचत गट वार्ड क्रमांक 9 मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्या तसेच वैशाली धनाजी भोसले मीरा बचत गट वार्ड क्र 1 मधून नगरसेवक मधून निवडून आल्या मनीषा मोहन तिकोटे आनंदी बचत गट वॉर्ड क्रमांक 10 मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्या तसेच नम्रता राहुल जगताप शक्तीदेवी बचत गट वॉर्ड क्रमांक 3 तसेच मंदाकिनी संजय पाडोळे ओम साई बचत गट वार्ड क्रमांक 4 मधून निवडून आल्या… महिलांना सक्षम करणे व महिलांना घडवणे यामध्ये लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या सहयोगिनी, CRP, लेखापाल…यांचाही त्यामध्ये खारीचा वाटा असतो.

