“विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आयुष्यातील पुढील दिशा ठरवावी” – बाबुराव बोत्रे पाटील

“विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आयुष्यातील पुढील दिशा ठरवावी” – बाबुराव बोत्रे पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/12/2025 : “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आयुष्यातील पुढील दिशा ठरवावी” असे विचार ओंकार शुगर ग्रुपचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे पाटील यांनी व्यक्त केले.
जवाहर शिक्षण प्रसारक मंङळ संचलित निमगाव विद्यामंदिर निमगाव येथे कै. धनंजय इनामदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांचा सन्मान करण्यात आला या वेळी ते बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंङळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार होते.
पुढे बोलताना बोञे पाटील म्हणाले, शालेय जीवनात आपण पुढे काय करायचे हे विद्यार्थीदशेत ठरविले पाहिजे आपले आई वडील व गुरूजण यांचा मान सन्मान ठेवला तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ. ग्रामीण भागातील मुले यशस्वी होतात हे मी सर्वाना दाखवुन दिले. माझेही शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे. ओंकार परिवाराच्या माध्यमातून 20 हजार लोकांना रोजगार निर्माण केले आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाखो शेतकरी ऊस तोङणी कामगार वाहतूकदार परिवाराशी जोडले गेलेले असुन आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीत्यांनी मनात कोणताही न्यूनगंड बाळगु नये असे आवाहन विद्यार्थीत्यांना केले. या वेळी निमगाव (म.) ग्रामपंचायत माजी सरपंच विठ्ठल मगर, शिवप्रेमी तरूण मंङळाचे अध्यक्ष लक्ष्मण पवार, मुख्याध्यापक टी एच् ननवरे, माजी मुख्याध्यापक रामचंद्र आसबे, धनाजीराव जाधव, सचिन मगर यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते.

