ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 24/12/2025 :
आपले जे कोणी मित्र असतील ते अनेकदा आपल्या कडून काही अपेक्षा करत असतात. त्यांच्या सूचना, कल्पना आपल्याला आवडल्याच पाहिजेत असा त्यांचा आग्रह असतो.
तसे न झाल्यास आपली गैरहजेरीत आपल्या विरुद्ध बोलणे, नावे ठेवणे चालू होते. कोणाकडून तरी आपल्याला हे समजले की आपला पण पारा चढतो अन् मैत्री तुटते. शालेय जीवनात अजून समज आलेली नसल्याने असे घडू शकते.
पण मुलांनो, मोठे होत जाल तशी मित्राची, मैत्रीची खरी ओळख होईल. मैत्री ही दाखवायची नसते तर टिकवायची असते हे समजेल. मनातून ओढ व आपुलकी, एकमेकांवरील विश्वास महत्वाचा असतो.
खरे मित्र ओळखा व मैत्री टिकवा.
सौ. स्नेहलता स. जगताप

