मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 24/12/2025 :
सहनशीलता हा सदगुण आपल्या प्रत्येकाच्या अंगी असणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट मनाविरुद्ध झाली की आपण त्याविषयी तीव्र प्रतिक्रिया देतो. त्या बोलण्यातून असतात किंवा कृतीतून.
अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत आपल्याला ते अनुभव येतो. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडाव्यात असे प्रत्येकाला वाटते. सबुरी, समजुतदारपणा किंवा संयम याचा अभाव जाणवतो अन् तुझे-माझे होते.
खरे तर कोणत्याही घटना घडतात त्या मागे काहीतरी कारण असते. एखादी गोष्ट नाही घडली तर त्यासाठी सुद्धा काही कारण असू शकते. योग्य वेळ यावी लागते. त्यामागील कारण पण समजून घेतले पाहिजे
आजचा संकल्प
एखादी घटना मनाविरुद्ध घडली किंवा कोणी मनाविरुद्ध वागले तरी संयम ठेवून ते मान्य करावे. वेळेनुरूप प्रसंग बदलतात. आपली पण वेळ येईल हे लक्षात घेऊ व प्रसंगाला सामोरे जावू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

