मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 23/12/2025 :
प्रत्येक कुटुंबाची कहाणी वेगळी असते. कोणी आई-वडिलांसह रहात असतात तर कोणी त्याच्या शिवाय. आई-वडील घरात असल्याने काही खूप समाधानी असतात तर काहींची कुचंबणा होत असते.
एकत्र राहताना प्रत्यकाने इतरांचा पण विचार केला पाहिजे. आम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणजे आमचेच सर्व ऐकले पाहिजे व तुम्हाला काहीच कळत नाही असे म्हणून जसे चालत नाही तसे तुम्ही आता म्हातारे झालात, चार घास खाऊन गुपचूप रहा हे म्हणणे पण चुकीचे आहे.
ज्येष्ठांनी (आपल्या अनुभवाचा) तरुण पिढीला त्यांनी मागितला तर सल्ला द्यावा व तरुणांनी आई-वडिलांचा योग्य मान राखावा. हे सर्व शेवटी प्रत्येकाच्या समजुतदारपणा वर अवलंबून असते.
आजचा संकल्प
कुटुंबातील प्रत्येकजण स्वतःची मते दुसऱ्यांवर न लादता, प्रत्येकाला प्रेमाची व आपुलकीची वागणूक देऊ व कौटुंबिक स्वास्थ्य जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

