ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 23/12/2025 :
शालेय शिक्षण घेत असताना, खूप लक्षपूर्वक अभ्यास करा. विषय बारकाईने समजून घ्या. परीक्षेचे तंत्र लक्षात घेऊन तशी तयारी करा व उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हा
पण त्याचवेळेस जीवनात उपयोगी पडतील अशाही काही गोष्टी शिकून घ्या. घरचा व्यवसाय असेल त्यात लक्ष घाला. शेती असेल तर शेतातील कामे शिका. घरात गरजेची आहेत अशी बारीक सारीक तांत्रिक कामे पण शिकून घ्या.
मुलांनो, पुस्तकी ज्ञानाची आवश्यकता असते तशी दैनंदिन जीवनात गरजेची असणारी छोटी-मोठी कामे पण जमली पाहिजेत. त्यातले बारकावे शिकून घ्या. जीवनात आपल्याला त्याचा फार उपयोग होतो.
पुस्तकी अभ्यासासोबत जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये आत्मसात करू व स्वयंपूर्ण जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

