निवडणूक जिंकली जाते, पण शेतकरी कधी जिंकणार❓

निवडणूक जिंकली जाते,
पण शेतकरी कधी जिंकणार❓
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 24/12/2025 :
निवडणूक झाली.
आपल्या पक्षाचा विजय झाला.
ढोल–ताशे वाजले, गुलाल उधळला गेला, घोषणा झाल्या.
क्षणभर वाटलं — आपण जिंकलो.
📍पण वास्तव तसंच उभं होतं.
शेतातली मोटार जळलेलीच होती.
पाणी थांबलेलं होतं.
पीक थांबलेलं होतं.
आणि घर चालवणारी चिंता मात्र सुरूच होती.
मग काय…
तोच शेतकरी, जो विजयाच्या गर्दीत उभा होता,
तीच जळलेली मोटार
आपल्या दुचाकीवर बांधून
तालुक्याच्या ठिकाणाहून दुरुस्ती करून
परत आपल्या शेतातल्या घराकडे निघालेला आहे.
हा फोटो खूप काही बोलका आहे.
विजयाचा जल्लोष झाला,
पण जवाबदारीची जाणीव
नेहमीप्रमाणे शेतकऱ्यालाच झाली.
कारण त्याला माहिती आहे —
▪️निवडून आलेला नेता
त्याच्या शेतात पाणी आणणार नाही.
▪️निवडून आलेला पक्ष
त्याची मोटार दुरुस्त करून देणार नाही.
आणि कोणीही
त्याच्या रोजच्या जगण्यातलं मरण
कमी करू शकत नाही.
मतं दिली जातात,
पण प्रश्न तसेच राहतात.
सत्तां बदलतात,
पण शेतकऱ्याचं ओझं बदलत नाही.
हा फोटो कोणावर आरोप करत नाही,
तो फक्त एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो,
निवडणूक जिंकली जाते,
पण शेतकरी कधी जिंकणार❓
सचिन कोल्हापुरे

