ताज्या घडामोडी

इथे मृत्यु स्वस्त आहे…

इथे मृत्यु स्वस्त आहे…

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 22/12/2025 :
कालच बांग्लादेश मध्ये एका हिंदुला भर चौकात जिवंत जाळण्यात आले, शेकडो हात आपल्या मोबाईलमध्ये हे चित्रीकरण करत होते, पण कुणाच्याही मनात माणुसकीचा झरा स्रवला नाही, ही बातमी वाचून मन सुन्न झाले.
हिंदु आयुक्तालयावर हल्ला झालाय, पूर्व शिक्षण मंत्र्यावर दगडफेक झालीय, हिंदुना टार्गेट केलं जातंय, जाळपोळ लुटालुट, कत्ल ए आम सुरू आहे.
आरोग्याचा एक सेवक म्हणून आम्ही वैद्य, डाॅक्टर मंडळी डोळ्यात तेल घालून एक एक क्षण मृत्युपासून माणसाला धूर कसे ठेवता येईल याचाच विचार करत असतो. उलट सुलट विचार करून काय योग्य होईल याचा विवेक करत असतो, आणि इथे उलट्या काळजाची ही वैचारीक दरिद्री, धर्मांध माणसे मृत्युला केवळ स्वस्त नाही तर मोफतच करून टाकतात. काय म्हणावे या क्रुरतेला ? कुठुन आली ही हैवानीयत ? काय चुक असेल त्या हिंदु तरूणाची ?
देव एक नाही तर अनेक असतात, हे म्हणणं हीच ती चुक होती. ? की हिंदु असणं ही त्याची चुक होती ?
भारतातील तथाकथित सुशिक्षित वैचिरीक सुंता झालेली सर्वधर्मसमभाव मानणारी बेगडी देशप्रेम दाखवणारी मंडळी कुठे शेपूट घालून गप्प बसली आहेत ?
ज्या बांग्लादेशची निर्मिती करायला आमच्याच देशाच्या निडर छातीच्या हिंमतवान बहाद्दूर पंतप्रधान इंदिरा गांधीनीच प्रयत्न केले होते म्हणे ! त्यांचा आत्मादेखील त्याच झाडावर तळतळाट करत जळत बसला असेल.
हेची फल काय मम तपाला असे तो आत्मा जळताना देखील म्हणत असेल.
सर्वधर्मसमभावाचा सेक्युलर किडा ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात वळवळत असेल, त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती जेव्हा अशा जळतयातना भोगेल तेव्हाच त्याच्यातील किड्याची वळवळ थांबेल, तोपर्यंत तो किडा कोणते तरी फुसके कारण देत या मृत्युचेदेखील समर्थन करेल.
शेम ऑन इट !
वाईट याच गोष्टीचे वाटते, भर चौकात एका व्यक्तीला फरफटत आणले जाते, तुडवले जाते, अक्षरशः मरेपर्यंत मारले जाते, आणि शेवटी झाडाल उलटे टांगून कोळसा होईपर्यंत जाळले जाते, ? पण गर्दीतील एकालाही दया येऊ नये ?
मृत्युला एवढे स्वस्त करून टाकले?
कुठुन आली ही क्रूरता? हैवानियत ? कोणी शिकवली ? कोणत्या धर्मग्रंथाचा आधार घेत ? हेच धर्मांध शिक्षण जर भारतातही दिले जात असेल तर काय करायला पाहिजे ?
आज परम आदरणीय हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब असते तर त्यांनी या लांड्यांना कोणत्या शिव्या घातल्या असत्या हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.
एकाबाजूने शांती अमन भाईचारा म्हणत सरकारी योजनांचा फायदा घ्यायचा, संविधान बचाव रॅलीत डोळ्यावर बुरखा ओढून, सहभागी व्हायचे, आणि दुसर्‍या बाजूने शरीयत प्रमाणे काफीरांना कापून काढायचे..
समस्त हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे, की आज तुम्ही सुपात आहात, जात्यात भरडून नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. वेळीच जागे व्हा, संघटीत व्हा, एकत्र रहा. निदान या प्रकरणात आपले मत तरी व्यक्त करा.
कोणत्याही गोष्टींवर बोलायचे नाही, नुसते मौन ! दोन अश्रु ढाळायचे नाहीत, की दोन शब्दात कधी व्यक्तही व्हायचे नाही, मोर्चा, धरणे, आंदोलन निषेध, या मार्गांचा वापर लोकशाहीत आहे, हे विसरलेली अशी एक षंढ हिंदु पिढी तयार होतेय, याचेच दुःख आहे.
माझा पंजा, माझी मशाल,
माझे चक्र, माझेच घड्याळ.
माझे इंजिन, माझेच फुल,
माझे धनुष्य आणि
माझे अस्तित्वच होतंय गुल.
माझा शाल निळी पांढरी
हिरव्याला उत्तर फक्त केशरी
एकच इच्छा, विचार पक्का
बहिर्जी नाईक हुकुमी एक्का
अननोन गनमेन सर्वत्र जावोत
आमच्यातूनच ते निर्माण होवोत.
अस्सल भारतीय विचारांचे हजारो धुरंधर तयार व्हायला पहिजेत आणि त्या 72 हूरवाल्या 54 देशात पोचले पाहिजेत, जिथे न्याय द्यायला दुसर्‍या वल्लाफल्लाची जरूरीच भासणार नाही.
एका दीपुदासच्या हौतात्म्याला, एक धुरंधर तयार व्हायला पाहिजे तरच या क्रुरतेला उत्तर मिळेल, नाहीतर हे तांडव भारतात पोचायला वेळ लागणार नाही.
हिंदुंनो वेळीच सावध व्हा,
शत्रु तुमच्या शेजारी पोचलाय…तो भारतातील राजकारण कोळून प्यायलाय. त्याच्या एका हातात संविधान आहे तर दुसर्‍या हातात नंग्या तलवारी आहेत, मुर्दाड मनामधे धर्मांधता आहे, माणुसकी संपलेल्या डोसक्यामध्ये हैवानीयत भरलेली क्रूरता आहे, डोळे आणि पाय नसलेली गर्दी खेचण्याची क्षमता आहे, … खतरेमेच्या एका बांगेत, लाखोंना एका ठिकाणी जमवण्याचे सामर्थ्य आहे.
आणि आम्ही समानतेच्या गोष्टी करत शीरकुर्मा खात, वादळ झाले म्हणून वाळूत डोके खुपसून बसलेल्या शहामृगासारखे, आणि निरोसारखे फिडल वाजवीत बसलो आहोत.
आमच्या घराला आग लागेल, तेव्हा बघू म्हणून शांत राहिलात तर कधीच जळून भस्मसात व्हाल.
टाकून द्या हा षंढपणा !
जटा सोडून हाती त्रिशूल घेत, डमरू वाजवित, तांडव करणारा रूद्र आपला आदर्श आहे.
समुद्रावर बाण रोखणारा श्रीराम माझा स्वामी आहे.
भीष्मांच्या अंगावर रथचक्र फेकणारे श्रीकृष्ण माझे दैवत आहे.
गांडीवाचा टणत्कार करणारा अर्जुन हा आपला आदर्श विसरलात काय?
महाराजांच्या भवानी तलवारीला गंज आलाय का ?
कालीमातेच्या हातातील नररूंडमाळा विसरलात काय?
रायरेश्वर ते रायगड हे जीवन कुणासाठी होते ?
डोळ्यात तापत्या सळ्या खुपसून सुद्धा धर्म बदलला नाही, गायीला कापणार्‍या कसायाचा हात कापताना सोळा वर्षाचा हात कधी थरथरला नाही, हे एवढ्यातच विसरलात ?
स्वामी विवेकानंदाचा, प्राप्य वरान्निबोधत, हा आदेश कुणासाठी आहे ?
फ्रान्सच्या समुद्रात स्वतःला कुणी आणि का झोकून दिले ?
शाळेय पाठांतर स्पर्धेत बक्षिस म्हणून साधे पेन मिळवण्यासाठी ही भाषणे पाठ केली होती काय ?
केवळ शिवगर्जना करीत रस्त्यावरून धावण्यासाठी आम्ही ही चरित्रे अभ्यासली नव्हती, हे विसरलात काय?
आलात तर तुम्हा संगे
नाही आलात तर तुम्हाला वगळून
आणि आडवे आलात तर तुम्हाला ओलांडून टाकत, आम्ही आमचे मार्गक्रमण करणारच आहोत.
आलात तर बरेच आहे.
धर्मासाठी हौतात्म्य पत्करणार्‍या दीपुदास या तेजस्वी हिंदु बांधवाला हीच श्रद्धांजली !
धर्मवीर संभाजी महाराज की जय !
छत्रपती शिवाजीमहाराज की जय !!
राजमाता जिजाऊ आईसाहेबांचा विजय असो !!!

वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग
22 डिसेंबर 2025

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button