चर्चेत मा.आ.”रामभाऊ सातपुते” नाव अग्रभागी

चर्चेत मा.आ.”रामभाऊ सातपुते” नाव अग्रभागी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 23/12/2025 : रविवारी लागलेल्या नगरपरिषद निवडणुक निकालाच्या चर्चेत अकलूजच्या निकालाची चर्चा होती, त्यात माजी आमदार रामभाऊ सातपुते हे नाव अग्रभागी! मात्र अकलूजच्या निकालात आजपर्यंत भाजपा दूरदूरपर्यंत नव्हतं ते आज केंद्रस्थानी आलं, एकटा रामभाऊ अकलूजच्या मातीत तंबू ठोकून उतरतो काय, एकाकी लढा देतो काय अन् बघता बघता सिंहाच्या टोळीत सभा गाजवतो काय हे सगळंच जिल्ह्यासाठी नवखं होतं. आजपर्यंत ज्या अकलूजमध्ये पॅनल लावण्यासाठी भाजपला माणसं मिळत नव्हती तिथं २६ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष अशा उमेदवारांचा भाजपचा अख्खा पॅनल रामभाऊ सातपुते यांनी लावला, पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांची खंबीर साथ सोडली तर एकही बडा नेता तिथे प्रचाराला नव्हता, मात्र जराही मागे न हटता शेवटपर्यंत सिंहांना घाम फोडणारा एकटाच भाजपाचा वाघ राज्यानं पाहिला.
एका बाजूला माजी उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह राज्यातली स्टार प्रचारक टीम आणि सोबतीला सगळी रसद घेऊन उतरलेले विरोधक आणि दुसऱ्या बाजूला अठरापगड जातीतला, फाटका एक एक माणूस गोळा करत अख्खा पॅनल उभा करत निवडणुकीत पाय रोवून उभा असलेला हा नेता अनेकांनी पाहिला. प्रचारात जेव्हा व्यक्तिगत टीका झाली तेव्हा जराही डगमगला नाही, उलट मला या अकलूजला परिवर्तन करायचं आहे म्हणत लढा दिला, आणि त्याचं यश म्हणजे ज्या अकलूजला पॅनल लावायला माणसं मिळत नव्हती, प्रस्थापित नेत्यांचं जिल्ह्याचं राजकारण जिथून चालत होतं त्याच अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीने स्वबळावर आज ४ नगरसेवक निवडून आणले आहेत, ७-८ नगरसेवक पदाचे उमेदवार केवळ २५-५० इतक्या थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजाताई कोतमिरे यांना ९७१७ मतं पडली.
अकलूजमध्ये भाजपा हरली असं म्हणत असताना भाजपा लढली कशी हेसुद्धा पाहणं महत्वाचं आहे, जिथे माणूस नव्हता तिथे ४१% मतं घेऊन भाजपा पाय रोवून उभी आहे. आजचा संघर्ष उद्याच्या भरघोस यशाची नांदी आहे. रामभाऊ आज आमदार नसले तरी लढण्याची उमेद हरली नाही, स्वतः उमेदवार नसतानाही, तिथे दंड थोपटून भाजपचा झेंडा लावणं हे वाटतं तितकं सोपं नाही. अख्खं अकलूज आज भाजपला जिंकता आलं नसेल पण गड हलवून सोडला हे कमी नाही, ४ नगरसेवकांचा विजय हा अकलूजच्या उद्याच्या भाजपच्या बहुमताची चाहूल आहे. रामभाऊ, आगे बढो…🙌🪷
– विकास विठोबा वाघमारे
#vikaswaghamare #mohol

