प्रताप क्रीडा मंडळाच्या समुहनृत्य स्पर्धेत कलाकारांचे दर्जेदार सादरीकरण

प्रताप क्रीडा मंडळाच्या समुहनृत्य स्पर्धेत कलाकारांचे दर्जेदार सादरीकरण
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 13/12/2025 : शंकरनगर – अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने स्मृती भवन शंकरनगर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत बालकलाकारांनी दर्जेदार सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेस मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, चि. सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी स्पर्धेला भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपारांणी मोहिते पाटील, प्रदीपराव खराडे, दीपकराव खराडे, उपाध्यक्ष पोपटराव भोसले, सचिव बिभिषन जाधव यांचे सह मंडळाचे संचालक, सदस्य,रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी परीक्षक योगेश देशमुख म्हणाले, प्रताप क्रीडा मंडळाने संस्थापक जयसिंह मोहिते पाटील व अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ४८ वर्ष अत्यंत शिस्तबद्ध या स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रामध्ये अशा स्पर्धा कुठेही पाहायला मिळत नाहीत. यातून अनेक कलाकार घडलेले आहेत.तर आर्लेकर यांनी या कलेतून भविष्यामध्ये कलाकारांना करिअरच्या विविध संधी निर्माण होत असल्याचे सांगितले.

गट क्रमांक २ (५ वी ते ७ वी -पारंपरिक गीते, ग्रामीण गट- ब ) प्रथम क्रमांक श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, कोळेगांव
द्वितीय लिटल एंजेल्स इंग्लिश मेडियम स्कूल, गारवाडपाटी
तृतीय श्री संत तुकाराम विद्यालय बोंडले. उत्तेजनार्थ जि. प. प्राथ. शाळा, मुंडफणे वस्ती, महाळुंग,
हनुमान विद्यालय, शिंदेवाडी, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल, सांगोला, जि. प. प्राथ. शाळा, तुपेवस्ती मेडद.
(शहरी गट)
प्रथम क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, द्वितीय लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर,
गट क्र. ३ (८ वी ते १० वी ,बॉलीवूड डान्स, ग्रामीण गट-अ)
प्रथम क्रमांक श्री बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस,
द्वितीय कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती, तृतीय (विभागून)
श्री हनुमान विद्यालय, लवंग
गीताचे बोल,सावतामाळी विद्यालय, माळेवाडी अकलूज, चतुर्थ श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय, कोथरुड, पाचवा श्री गणेश विद्यालय, पिंपळनेर,
( ग्रामीण गट ब) प्रथम श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय, कोळेगाव, द्वितीय लिटल एंजल्स इंग्लिश मेडीयम स्कूल गारवाडपाटी
तृतीय श्री संभाजी बाबा विद्यालय, इस्लामपूर, चतुर्थ श्री शंभू महादेव विद्यालय, उंबरे-दहिगांव, पाचवा श्रीनाथ विद्यालय लोंढे मोहितेवाडी
यांनी यश प्राप्त केले.

