सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ओबीई व एनबीए मानांकन’या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ओबीई व एनबीए मानांकन’या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 12/12/2025 :
अकलुज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर येथे शैक्षणिक गुणवत्ता व एनबीए मान्यताप्रक्रिया मजबूत करण्यासाठी ‘आउटकम बेस्ड एज्युकेशन (OBE) व एनबीए अक्रीडिटेशन’ या विषयावरील पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम दि. ८ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख मान्यवर प्रा. गजानन धरणे यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

उद्घाटना वेळी डॉ. दत्तात्रय जाधव (जॉईंट डायरेक्टर, एम.एस.बी.टी.ई) व प्रा.ओम दरक (सेक्रेटरी, द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स,इंडिया, सोलापूर स्थानिक केंद्र) यांचे प्रमुख प्रतिनिधी ऑनलाइन उपस्थित होते आणि त्यांनी कार्यशाळेचा उद्देश, आवश्यकता तसेच OBE-NBA च्या आजच्या शैक्षणिक संदर्भातील महत्त्वावर मार्गदर्शन केले.

या सत्रांमध्ये प्रा.गजानन धरणे (श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक सोलापूर) ,प्रा.प्रमोद शिवगुंडे(श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक सोलापूर),प्रा.नितीन पवार(ए .जी .पाटील पॉलिटेक्निक ,सोलापूर) व प्रा.गजानन कुलकर्णी (डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आकुर्डी, पुणे)यांनी OBE संकल्पना,Vision–Mission–PEO, CO–PO Mapping, Attainment पद्धती, विद्यार्थी कार्यक्षमता, Documentation, Continuous Improvement हे महत्त्वाचे विषय प्रभावीपणे मांडले. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, SAR तयारी व पुरावा संकलन तंत्राचीही माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत इतर भागातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ८० पेक्षा जास्त फॅकल्टी सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. यामध्ये डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट कोल्हापूर, विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक इंदापूर, विलासराव देशमुख फाउंडेशन इंजीनियरिंग कॉलेज लातूर आणि शिवाजी पॉलीटेक्निक सांगोला, श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पानीव, संजय घोडावत इन्स्टिट्यूट मिरज, श्री आनंदराव अबितकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गारगोटी, डॉ.डी वाय पाटील अभियंत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर या संस्थांच्या शिक्षकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता, ज्यामुळे सर्व सत्रांमध्ये ज्ञानवृद्धी आणि शैक्षणिक देवाणघेवाण अधिक मजबूत झाली.
पाच दिवस चाललेली ही शैक्षणिक कार्यशाळा OBE, CO–PO Mapping, Attainment, गुणवत्ता सुधारणा व NBA संदर्भातील आवश्यक कागदपत्रांची समज वाढवणारी ठरली. महाविद्यालयाचे सचिव श्री राजेंद्र चौघुले यांच्या सहयोगातुन ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनात मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल निकम आणि कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा. गौरव फडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकिता फडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.मयुरी ननवरे यांनी केले.

