मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/12/2025 :
अनेकदा आपण ‘यश’ याबद्दल बोलत असतो. यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे किंवा यशस्वी कसे होता येईल? यावर खास मार्गदर्शन केले जाते.
आपले ध्येय गाठण्यासाठी आपली जबरदस्त इच्छाशक्ती उपयोगी पडते. आपली जिद्द, चिकाटी, कष्ट (अभ्यास) करण्याची तयारी, सराव या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. आत्मविश्वास असावा लागतो.
या सर्वात महत्वाची असते ती सुरुवात. तुम्ही त्या दिशेने पाऊल टाकणे खूप महत्वाचे असते. वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत पण सुरुवातच केली नाही तर काय उपयोग?
आजचा संकल्प
ध्येय प्राप्तीसाठी त्या दिशेने प्रथम पाऊल टाकू, सुरुवात करू. जिद्दीने व चिकाटीने सराव चालू ठेवू. आलेल्या अडचणींवर मात करू व यशस्वी होण्याच्या दृष्टीने एक एक टप्पा पूर्ण करू._
सौ. स्नेहलता स. जगताप.

