ताज्या घडामोडी

वर्षानुवर्षे ठेवल्यानंतरही मध खराब का होत नाही?

वर्षानुवर्षे ठेवल्यानंतरही मध खराब का होत नाही?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/12/2025 :
मधात पाण्याचे प्रमाण खूप कमी असते आणि ते नैसर्गिकरित्या आम्लयुक्त असते. यामुळे बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव वाढू देत नाहीत. म्हणून, मध कधीही खराब होत नाही, कालांतराने त्याचा रंग गडद होऊ शकतो किंवा तो स्फटिकरूप होऊ शकतो. परंतु ते खाण्यास नेहमीच सुरक्षित असते.
मध म्हणजे काय?
मध हा एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे जो मधमाशा फुलांच्या रसापासून बनवतात. मधमाशा फुलांमधून रस गोळा करतात, त्यांच्या पोटात एन्झाईम्स वापरून ते तोडतात आणि नंतर ते पोळ्यात साठवतात आणि त्यांच्या पंखांनी ते वाळवतात.
मधात सर्वात जास्त काय आढळते?
साधारणपणे मधात 80-85% कार्बोहायड्रेट्स, 15-17% पाणी, 0.3% प्रथिने, 0.2% राख आणि थोड्या प्रमाणात अमिनो आम्ल, फिनॉल, रंगद्रव्ये आणि जीवनसत्त्वे असतात. याशिवाय, इतर घटक देखील आढळतात.
आरोग्यासाठी किती फायदेशीर?
मधाच्या सेवनाने घशातील खवखव दूर होते. कोमट पाण्यासोबत किंवा आल्याच्या रसासोबत ते घेतल्याने लगेच आराम मिळतो. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्याने चयापचय वाढतो.
मधाचे खास गुण कोणते?
मध कधीच खराब होत नाही. त्यात ओलावा खूप कमी असतो. त्यात हायड्रोजन पेरोक्साइडसारखे नैसर्गिक अँटीसेप्टिक घटक असतात. त्यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतात, जे त्वरित ऊर्जा देतात.
मध कोणाला देऊ नये
एक वर्षापेक्षा लहान मुलाला कधीही मध देऊ नये. त्यामुळे बोटुलिझमचा धोका असतो. शुद्ध मध नेहमीच घट्ट आणि चिकट असतो आणि पाण्यात लगेच विरघळत नाही. किडनी स्टोनच्या रुग्णांव्यतिरिक्त, मधुमेहाच्या रुग्णांनाही कधीही मध देऊ नये.
रंग आणि चवीत बदल
कालांतराने, तुम्हाला लक्षात येईल की मधाचा रंग थोडा गडद होईल. त्याचा वास आणि चव देखील नाहीशी होईल, परंतु तरीही ते खाल्ले जाऊ शकते.
झोपण्यापूर्वी मध खाण्याचे फायदे
झोपण्यापूर्वी मध खाल्ल्याने चांगली झोप येते, खोकला कमी होतो, पचनक्रिया मजबूत होते आणि वजन कमी होते. मधात असलेले ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल शरीरात मेलाटोनिन आणि सेरोटोनिनचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते.
तथ्ये
एक मधमाशी तिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त 1/12 चमचा मध बनवते. 1 किलो मध बनवण्यासाठी, मधमाशांना सुमारे 40 लाख फुलांमधून अमृत गोळा करावे लागते.
मध्यंतरी सेवानिवृत्तीचे वय नेमके काय असावे? ह्यावर झालेल्या परिसंवादाचे एक कात्रण वाचनात आले. दोन्ही बाजूंचे लोक आपले म्हणणे कसे बरोबर हे पोटतिडकीने पटवून देत होते. खरंच विचारात पडणाराच विषय आहे हा. विचार करताना आपोआप दोन्ही बाजूंनी झुकायला होत.
नुकत्याच सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या एका सद्गृहस्थांचे विचार ऐकण्यात आले. विचार कसले म्हणा त्यांची चिडचिड, त्यांचा उद्वेग बाहेर पडत होता. पण कुठेतरी त्यांचे म्हणणे, त्यांचे विचार आपल्याला विचारात पण पाडतं होते हे नक्की.
त्यांचे म्हणणे निवृत्तीचे वय ठरले तेव्हा सरासरी आयुर्मान कमी होते. आता साठीनंतरही आम्ही शारिरीक, मानसिक तंदुरुस्त असतो. काम करण्याची उर्जा आमच्या कडे असते आणि सेवाभावी वृत्तीने प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती आमच्या पिढीत उपजतच असते. तसेच व्यापारात माणूस बरेच वर्ष कार्यरत राहू शकतो तर नोकरीत का नाही, हा प्रश्नही त्या गृहस्थांनी उपस्थित केला होता.
त्याचवेळी एक नुकताच आपले पूर्ण शिक्षण आटोपून नोकरी करण्यासाठी उत्सुक असलेला मुलगा समस्त तरुणवर्गाची बाजू हिरीरीने मांडत होता. तो म्हणाला आमची पिढी बेरोजगार होऊन भलत्या वळणाला लागायला काही प्रमाणात हे पण एक कारण होईल.
ह्या त्यांच्या विचारांनी ह्या विषयाकडे दोन्हीबाजूंनी बघायचे ठरविले तर काय काय मुद्दे उपस्थित होतील ह्याचा विचार मनात यायला लागला. अर्थात ही पोस्ट वाचून वाचकांची पण वेगवेगळी मतं,विचार कळतील.
सर्वप्रथम निवृत्तीच्या वयानंतरही कोणी शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती चा दाखलाही आणला तरी कुठेतरी ह्या फेरबदलाच्या चक्राला धक्का लागेल. पानगळीचा मोसम आल्यानंतर नवीन पालवीला जागा रिक्त करुन देण्याचा नियम आपण निसर्गाकडूनच शिकलो. जर जुन्या पिढीला अजून पुढे नोकरीतच सामावून ठेवले तर आपली नवीन पिढी ही बेकार राहील हे एक मोठे नुकसान असेल हे नक्की. नवनवीन तंत्रज्ञानाचा या युगात रोज नवीन आविष्कार येतोय हे पण खरे. जुन्या पिढीला सरसकट नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे कदाचित नवीन पिढीइतके जमणार नाही ही पण एक वस्तुस्थिती.
अर्थात शारीरिक, मानसिक तंदुरुस्त असतांना काम कमी झाल्याने एक पोकळी निर्माण होईल.आणि हा अंगावर आलेला,खायला उठलेला वेळ कसा घालवायचा हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकेल. तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधाव्या लागतील.
सध्याच्या काळात कामातून निवृत्ती मिळते पण इतक्या वर्षांच्या बिझी शेड्युल मधून एकदम कंटाळवाणी उसंत मिळणं पण तितकसं झेपतं नाही प्रत्येकाला. शेवटी काय तर सरासरी बघता साठीनंतर साधारण पंच्याहत्तरी पर्य़तचा हा कालावधी अगदी तसा अगदी अल्पकाळ नसतो.
शेवटी काय तर ह्या समस्येवर आपापल्या परिस्थितीनुसार, आपापल्या बौद्धिक चातुर्यानेच मार्ग शोधावा लागेल हे नक्की.

कल्याणी बापट(केळकर) 9604947256
बडनेरा, अमरावती

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button