ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/12/2025 :
सध्या ‘प्रदूषण’ हा विषय प्रत्येकाच्या तोंडी असतो. ते होऊ नये यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्नशील असावे असे आपल्या प्रत्येकाला वाटते. पण म्हणजे नेमके काय करायचे?
प्रत्येकाने थोडी थोडी काळजी घेतली तरी विषय सोपा होऊन जाईल. आपण विज्ञान शिकतो. आपल्याला हवे मधील घटक माहित असतील त्यामध्ये जीवसृष्टीला गरजेचा असलेला ऑक्सिजन किती टक्के आहे ते पहा.
हवेत इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढले तर आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळेल का? झाडे ऑक्सिजन उत्सर्जित करतात. मग ‘वायू प्रदूषण’ रोखण्यासाठी आपण वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे प्रमाण वाढवले व वृक्षतोड थांबली तर?
तुम्हाला काय वाटते?
झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

