ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 03/12/2025 :
सध्या थंडी खूप आहे. प्रत्येकाने थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक काळजी घेतली पाहिजे. गरम कपडे, पायात मोजे घातले तरी डोके झाका. कानात थंड हवा जायला नको म्हणून कापूस घाला.
ही सर्व सांगण्या मागचा हेतू हा की, मुलांनो व्यवस्थित काळजी घ्या. खूप थंडी आहे, वातावरण अचानक बदलले आहे, आणि त्यामुळे आजारपण वाढले आहे. आपण वेळीच काळजी घेऊया आणि आपले आरोग्य जपू या.
ज्यांची सकाळी शाळा असेल त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शाळेत जाताना पिण्याचे पाणी कोमट करून बाटलीत भरा. पाणी भरपूर प्या. हात-पाय, छाती, डोके उबदार राहील अशी काळजी घ्या.
सौ. स्नेहलता स. जगताप.

