ताज्या घडामोडी
मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 03/12/2025 :
जीवनात प्रत्येकजण विविध समस्यांना सामोरे जात असतो. मात्र ज्याला त्याला आपापल्या समस्या सोडवाव्या लागतात. कोणी मदतीला आले तरी ते तात्पुरते असते. त्यातून मार्ग तर आपल्यालाच काढायचा असतो.
अशा वेळेस माणसांची खरी ओळख होते. मदत करायला नको म्हणून जवळचे सुद्धा लांब जातात. काहीही कारणे सांगून टाळण्याचा प्रयत्न करतात. तू व तुझे नशीब म्हणून दूर करतात.
तशी वेळ तर कोणाचीच रहात नाही. तीच व्यक्ती जिद्द व प्रयत्नांच्या जोरावर परिस्थितीवर मात करते. खूप काहीतरी वेगळी बनते, बरेच काही शिकते.
आजचा संकल्प
कोणी अडचणीत सापडले, कोणावर वेळ आली तर जमेल त्या पद्धतीने मदत करू, न जमल्यास निदान त्यांच्या सोबत राहू व मानसिक आधार देऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

