जोतिबा देवाची बहीण म्हणजे आई यमाई

जोतिबा देवाची बहीण म्हणजे आई यमाई
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 03/12/2025 :
हे शिल्प पाहून काहीतरी वेगळेच दिसत असेल, तर हे शिल्प आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी जोतिबाच्या डोंगरावरील आई यमाई देवीच्या मंदिरावरील. जोतिबा देवाची बहीण म्हणजे आई यमाई. तिचे मंदिर जोतिबा मंदिराकडून सज्जावरुन बाहेर पडता पायरी मार्गाने चाफा वनात आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेस जोतिबा देवाची यात्रा भरते. जोतिबा देवाला मुलगी पहाय गेलेलेली बहीण यमाई देवी ही जोतिबावर रुसून चाफा वनात गेली. तर देव आपल्या बहिणीला वर्षांतून एकदा आपल्या लवाजम्यासह चैत्र शुद्ध पौर्णिमेस भेटाय जातात. तोच हा जोतिबा देवाच्या यात्रेचा दिवस.
तर जे शिल्प आपण पाहत आहात ते शिल्प आहे बहीण भावाचे. या शिल्पातील कथा जी पश्चिम महाराष्ट्रात आजही खुप प्रचलित आहे. व याने लहाण मुलांपासून मोठ्यांपर्यंत चांगले संस्कार घडलाय कारणीभूत ठरते. भाऊ हा भांडखोर आपल्या बहिणीचा अनादर करणारा असतो तो बहीण वारंवार तिला लाथ मारत असतो. एके दिवशी बहीण संतापून भावाला बोलते मला पायाने तु लाथा मारतोय तर तुझ्या पायात किडे पडतील. काही काळ लोटल्यावर भावाच्या पायात किडे पडले. तेच किड बहीण स्वताच्या हाताने काढत आहे. भावाची सेवा करत आहे. तर आकाशाकडे बोट वर करत आपल्या बहीणी सोबत संवाद साधत आहे. व बहीण ही आकाशाकडे मान वर करून पाहत भावास अनुमोदन देत आहे. तर आजही पश्चिम महाराष्ट्रात जर कोणाला पाय लागला तर पाया पडले जाते. लहान मुलांना ही घरातील महीला पुरुष बोलत असतात बहिणीला लाथ मारु नकोस पायात किड पडतील. मला व माझ्या लहान भावाला माझी आई बोलत असायची बहिणीला लाथ मारत नाहीत पायात किडे पडतील. पाया पड बहिणीच्या. पाटेश्वर ला जाऊन बघ कशी बहीण भावाच्या पायातील किड काढत आहे. असा संदर्भ, दाखला देत माझी आई मला सांगत असे. आई कडूनच समजले की असेच शिल्प सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील पाटेश्वर या महादेवाच्या देवस्थानी शिल्प आहे. या शिल्पाच्या माध्यमातून स्त्री चा आदर करणे हे शिकवण हजारो वर्षांपासून दिली जात आहे. व आज बऱ्याच जनांच्या मनावर चांगले परिणाम करुन गेलेले हे शिल्प आहे.
तुम्ही आजवर बऱ्याच वेळेस यमाई देवीच्या दर्शनास गेला असाल पण हे शिल्प दिसले नसेल. तर हे आहे कोठे सांगतो. पायऱ्या उतरून मंदिराकडे येत असताना मंदिरात जाण्यासाठी लाईन लागत. त्या लाईन ने जात असताना मंदिराकडे तोंड केल्यावर डाव्या बाजूस मंदिराच्या भिंतीवर हे शिल्प आहे. तेथे असणारे हे एकच शिल्प नाही तर शरभ, गंडभेरुड, व्याल, महीशासुर मर्दानी, धनुर्ध युद्धात विर मरण पावलेल्या योध्यास स्वर्गात घेऊन जात असलेल्या अप्सरा. अशी अनेक शिल्प आहेत.
✍🏻 दुर्गवेडा कृष्णा घाडगे

